Fact Check : कोविड अलर्ट! पाण्याद्वारेही वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:12 PM2021-05-11T12:12:33+5:302021-05-11T12:19:24+5:30

Fact Check : सांडपाण्यात व्हायरसचे सक्रिय जीन्स सापडले आहेत. आता नदी, नाल्यांच्या पाण्यातून कोरोना व्हायरस पसरू शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Fact Check : Netherlands scientists have found active genes of the coronavirus in the treatment plant | Fact Check : कोविड अलर्ट! पाण्याद्वारेही वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Fact Check : कोविड अलर्ट! पाण्याद्वारेही वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

googlenewsNext

देशभरातील लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करावा लागत आहे. रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता असल्याचं दिसून येत आहे. तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. दिवसेंदिवस संक्रमितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दरम्यान पाण्यापासून कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. नेदरलँडच्या वैज्ञानिकांनी याबाबत संशोधन करून आपलं मत मांडलं होतं. आता लोकांच्या मनातल संभ्रम दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी याबाबतची सत्यता पडताळून पाहिली आहे. 

काय सांगतो रिपोर्ट?

सध्या एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की नेदरलँड्समधील वैज्ञानिकांना एका उपचार केंद्रात विषाणूचे सक्रिय जीन्स आढळले. इतकेच नाही तर २००२- ०३मध्ये  कोरोना विषाणूबद्दलचा अहवाल यूके सेंटर फॉर यूरोलॉजी अँड हायड्रोलॉजीच्या माध्यमातून समोर आला होता. त्यावेळी विषाणू सांडपाणी आणि घाणेरड्या पाण्यातही आढळला होता.

त्यावेळी संक्रमित थेंब एअरोसॉलच्या माध्यमातून पाण्यात पोहोचले होते. त्यामुळे  संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली.  २००२ मध्ये या आजाराने एकाच महिन्यात जवळपास २९ देशांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. याच  कारणामुळे मोठ्या संख्येनं लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. 

पाण्यानं पसरत नाही कोरोना- जागतिक आरोग्य संघटना

रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार सांडपाण्यात व्हायरसचे सक्रिय जीन्स सापडले आहेत. आता नदी, नाल्यांच्या पाण्यातून कोरोना व्हायरस पसरू शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मध्यप्रदेशातील राजघाटच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. यावेळी  ही चाचणी निगेटिव्ह आल्याचं दिसून आलं. तसेच  जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा प्रसार पाण्यातून होत नाही. अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

डबल मास्क लावणं गरजेचं ?

कोरोना कालावधीत आपण आपल्या स्वतःच्या घरी रहायला हवे. परंतु जर आपण काही कामामुळे घराबाहेर जात असाल तर मास्क वापरायला हवा. डबल मास्क वापरल्यास व्हायरसपासून चांगले संरक्षण मिळू शकते. डब्ल्यूएचओपासून डॉक्टरांपर्यंत सगळ्यांचेच असे म्हणणे आहे की डबल मास्क घालणे कोरोना कालावधीमध्ये फायदेशीर ठरू शकते. कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

Web Title: Fact Check : Netherlands scientists have found active genes of the coronavirus in the treatment plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.