मेंदुतील 'हा' घटक ठरवतो तुमचा आनंद आणि दु:ख; जाणून घ्या आनंदी राहण्याचं सिक्रेट...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:51 PM2021-05-21T19:51:33+5:302021-05-21T19:52:39+5:30
काहीवेळा आपण आनंदी असतो तर काहीवेळा दु:खी. आपल्याला वाटतं यामागील आपल्या मनात येणाऱ्या भावना जबाबदार असतील. पण हा समज चुकीचा आहे.
काहीवेळा आपण आनंदी असतो तर काहीवेळा दु:खी. आपल्याला वाटतं यामागील आपल्या मनात येणाऱ्या भावना जबाबदार असतील. पण हा समज चुकीचा आहे. आपल्या शरीरात काही असे हार्मोन्स असतात जे आपल्याला आनंदी किंवा सकारात्मक (Positive) ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. डोपामाइन (Dopamine) हे असंच हार्मोन आहे. ज्याच्या स्त्रवण्यामुळे आपण आनंदी व्हावं की दु:खी हे आपलं शरीर ठरवतं. जेव्हा मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात डोपामाइन केमिकल (Dopamine Chemical) रिलीज होतं तेव्हाच सकारात्मक भावना निर्माण होतात. त्याचबरोबर जेव्हा हे केमिकल कमी रिलीज होतं तेव्हा आपल्याला निराश वाटायला लागतं. डोपामाइन केमिकलच प्रमाण वाढवणं किंवा कमी करणं मानवी मेंदू आणि न्यूरोट्रांसमीटर बँड्सवर अवलंबून असतं. मात्र त्याला नैसर्गिकरित्या (Naturally) काही प्रमाणात वाढवता येऊ शकतं. सकारात्मक आणि आनंदी जगण्यासाठी या गोष्टी नक्की करा.
त्यामुळे डोपामाईन रिलीज होणं वाढवायचं असेल व जास्त सकारात्मक व्हायचं असेल तर खालील उपाय कराच
प्रोटीन भरपूर प्रमाणात घ्या
हेल्थलाई मध्ये डॉक्टर एरिका जुल्सन यांच्य म्हणण्यानुसार नुसार, प्रोटीनमध्ये एकुण १२ प्रकारचे अमिनो अॅसिड असतात ज्यातील काही शरीरात डोपामाइन केमिकल तयार करतात. एका संशोधनानुसार प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये असणाऱ्या अमिनो अॅसिड्समुळे मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी वाढते. याचाच परीणाम म्हणून विचार करण्याची क्षमता वाढते तसेच स्मरणशक्तीही मजबूत होते.
सॅच्युरेटेड फॅट कमी करणे
एका संशोधनानुसार सॅच्युरेटेड फॅट याच जास्त प्रमाणामुळे मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी कमी होते. बटर, फूल फॅट डेअरी प्रोडक्ट, पामतेल, नारळाचं तेल यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास सॅच्युरेटेड फॅट वाढते त्यामुळे या पदार्थांचा वापर कमी करा.
गुड बॅक्टेरिया
संशोधकांच्या मते आतड्यांचा व मेंदूचा संबंध जवळचा असतो. आपल्या इंटेस्टाइनमध्ये गुड बॅक्टेरीया असतील तर त्यामुळे मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी वाढायला मदत होते. ज्याचा परिणाम आपल्या वागण्यावर तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मुड तयार होण्यावर होतो. त्यामुळे प्रोबायोटिक प्रोडक्टचं सेवन केल्यास उत्तम.
व्यायाम आणि योगासनं करणे
आवड्यामधून दररोज १ तास योगा केल्यास डोपामाइन केमिकल लेव्हलवर याचा सकारात्मक परिणाम होतो. मेंदूमध्ये डोपामाइन लेव्हल कमी झाल्यास पार्किंसन हा आजार होतो. त्यामुळे दररोज योगा आणि व्यायाम केल्याने आपला मूड चांगला राहतो आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं.
पुरेशी झोप
झोप कमी झाल्यास डोपामाईनवर त्याचा विपरीत परिणाम होतो. झोप पूर्ण होत नसल्यास शरीरात नॅचरल डोपामाइनच्या स्त्रवण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मानसिक आजार होण्याचीही शक्यता असते.
संगीत आणि ध्यानधारणा
संगीत ऐकल्याने मेंदूमध्ये डोपामाईन ९ टक्क्यांनी वाढतं तर १ तास संगीताचा आनंद घेतल्यास ६४ टक्के डोपामाइन वाढतं. त्यामुळे गाणी ऐकत योगा किंवा व्यायाम केल्यास त्याचा जास्त फायदा होतो.