फास्ट फुड, नो एक्सरसाईज हीच नाहीत वजन वाढण्याची कारणं, 'हे' कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 05:16 PM2021-06-27T17:16:58+5:302021-06-27T17:18:28+5:30

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात. 

Fast food, no exercise, no reasons for weight gain, you will be surprised to read 'this' reason | फास्ट फुड, नो एक्सरसाईज हीच नाहीत वजन वाढण्याची कारणं, 'हे' कारण वाचून व्हाल अवाक्

फास्ट फुड, नो एक्सरसाईज हीच नाहीत वजन वाढण्याची कारणं, 'हे' कारण वाचून व्हाल अवाक्

Next

वजन वाढण्याची खुप कारणं असतात. त्यापैकी व्यायामाचा अभाव व अनहेल्दी खाण्याच्या सवयी या जास्त जबाबदार असतात. मात्र, वजन वाढवण्यासाठी बदलत्या जीवनशैलीप्रमाणे आयुष्यामध्ये ताणतणाव वाढल्यामुळे देखील वजन वेगाने वाढते. ताण घेतल्यामुळे वजन कसे वाढते हे जाणून घेऊयात. 

तणावामुळे वजन वाढते
आपण तणावात असतो, तेंव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे आपल्या रक्तातील ग्लूकोज बाहेर पडते. यामुळे तुमचे वजन वाढते. तणावामुळे, आपल्याला पुरेशी झोप येत नाही जे शरीरात कोर्टिसोलची पातळी वाढवण्याचे मुख्य कारण आहे. तसेच यामुळे तुम्हाला जास्त भूक देखील लागते.

अनहेल्दी खाणं
तणावामुळे आपण आपल्या डोळ्यांसमोर असलेली प्रत्येक गोष्ट खातो. विशेषतः सहजपणे उपलब्ध असलेल्या अशा गोष्टी खायला आवडतात. फास्ट फूड हा आपला आवडता आहार बनतो, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते.

आळस येणे 
कोर्टिसोलच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शरीरात सतत आळस येतो. त्यामुळे आपण व्यायाम करणे टाळतो. तसेच आपण शरीरारीक हालचाल करायलाही कंटाळतो.

भूक न लागणे किंवा भूक वाढणे 
तणावामुळे आपली भूक कमी होऊ शकते किंवा अधिक होऊ शकते. यामुळे आपण अनियमित जास्त खातो आणि यामुळेच आपले वजन झटपट वाढण्यास सुरूवात होते.

काय उपाय कराल
योग्य आहार घ्या 

वजन कमी करण्याचा अर्थ उपाशी राहणे नव्हे तर आपल्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करणे होय. अन्नावर प्रक्रिया केलेल्या गोष्टीऐवजी आरोग्यदायी गोष्टी खा. यामुळे आपले पोट बराच काळ भरल्यासारखे वाटते आणि यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.

जास्तीतजास्त पाणी प्या
पाणी हा उर्जेचा मुख्य स्रोत आहे. पाण्यामुळे तुमचे पचन कार्य व्यवस्थित होते. तसेच तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. पाण्यामुळे तुमची भूकही कमी होते.

Web Title: Fast food, no exercise, no reasons for weight gain, you will be surprised to read 'this' reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.