डायबिटीसपासून सुटका मिळवायची असेल तर 'हा' उपाय ठरेल तुमच्यासाठी वरदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 10:01 AM2019-12-16T10:01:31+5:302019-12-16T10:06:59+5:30

आता तर अनेकांना कमी वयातच डायबिटीस होऊ लागला आहे. त्यामुळे यासंबंधी वेगवेगळे रिसर्च समोर येत आहेत.

Fasting for 14 hours daily may help fight and control diabetes new study suggests | डायबिटीसपासून सुटका मिळवायची असेल तर 'हा' उपाय ठरेल तुमच्यासाठी वरदान!

डायबिटीसपासून सुटका मिळवायची असेल तर 'हा' उपाय ठरेल तुमच्यासाठी वरदान!

Next

वजन वाढणं ही समस्या अलिकडे फारच वेगाने अनेकांना आपल्याला जाळ्यात घेत आहे. आणि एकदा का तुम्ही लठ्ठपणाचे शिकार झालात तर डायबिटीसपासून ते हृदयरोगांपर्यंत अनेक जीवघेण्या आजारांचा धोका वाढू शकतो. आता तर अनेकांना कमी वयातच डायबिटीस होऊ लागला आहे. त्यामुळे यासंबंधी वेगवेगळे रिसर्च समोर येत आहेत.

डायबिटीसला द्या मात

(Image Credit : newatlas.com)

sciencedaily.com ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे १२ ते १४ तासांचा उपवास करणे आणि काही तासांच्या लिमिटेड वेळेत जेवण करणे हा ट्रेन्ड फारच प्रसिद्ध होत आहे. सेलिब्रिटींपासून ते फिटनेस एक्सपर्ट्सपर्यंत वजन कमी करण्यासाठी लोक ही पद्धत फॉलो करत आहेत. मात्र, रोज १४ तास उपवास करून केवळ वजनच कमी होतं असं नाही तर डायबिटीससारख्या गंभीर आजारालाही मात दिली जाऊ शकते, असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.

काय सांगतो रिसर्च?

(Image Credit : healthline.com)

एका नव्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जर रोज १४ तास उपवास केला गेला आणि १० तासांच्या वेळेत जेवण केलं गेलं तर डायबिटीसचा धोका अनेक पटीने कमीही होतो आणि डायबिटीसवर सहजपणे नियंत्रणही मिळवता येऊ शकतं. मात्र, ज्यांना आधीच डायबिटीस झाला आहे त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचं सेवन करायचं आहेच. सॅन डिएगोतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार, दररोज १० तासांच्या वेळत जेवण केल्याने ना केवळ वजन कमी होईल तर कोलेस्ट्रॉल लेव्हलही योग्य होईल.

वजन, ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर झालं कमी

१२ आठवडे म्हणजे ३ महिने चाललेल्या या रिसर्चमध्ये १९ सहभागी लोकांचा ट्रायल घेण्यात आला. यातील जास्तीत जास्त लोक हे लठ्ठपणाचे शिकार होते. त्यांना दररोज १४ तास फास्टिंग करण्यास सांगण्यात आले. १२ आठवड्यांनंतर समोर आलेल्या निष्कर्षातून हे दिसून आलं की, लोकांचं बीएमआय तर कमी झालंच सोबतच वजन आणि बॉडी फॅटही कमी झालं. त्यांचं ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर लेव्हलही योग्य झाली.

रिसर्चआधी यातील सहभागी लोक वेगाने डायबिटीसच्या जाळ्यात अडकत होते. पण रिसर्चनंतर त्यांना डायबिटीसचा धोका पूर्णपणे टळलाय, असा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे.


Web Title: Fasting for 14 hours daily may help fight and control diabetes new study suggests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.