नऊ दिवसांचे उपवास करताय?- मग या चूका टाळाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:42 PM2017-09-23T13:42:32+5:302017-09-23T14:05:09+5:30
उपवसांचा शरीराला लाभ व्हायला पाहिजे, अन्यथा तब्येत बिघडण्याचाच धोका जास्त
नवरात्रात हल्ली अनेकजण उपवास करतात. कुणी श्रद्धा म्हणून. कुणी मित्र करतात म्हणून कुणी वजन कमी करायचं म्हणून कुणी डिटॉक्स म्हणून. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील पण 9 दिवस उपवास करणार्यांचं प्रमाण मोठं. मात्र क्रेझी डाएट केलं आणि फक्त फळं, पाणी किंवा ज्युस पिऊन राहिलं म्हणजे डिटॉक्स होईल असं काही नाही. तुम्ही उपवास करत असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या करा, तरच उपवासाचे लाभ मिळतील.
1) दिवसाची सुरुवात, म्हणजेच सकाळी उठल्याउठल्या घोटभर कोमट पाणी किंवा दुध घ्या. घोटभरच खूप पाणी किंवा दूध पिऊ नका.
2) त्यानंतर एखादं फळ खा. खरं तर रात्री पाण्यात भिजवलेले अंजीर-मनुका-बदाम खाणं उत्तम. फळं खाणार असाल तर डाळींब किंवा चिकू, पपई खा. केळ नको.
3) थोडय़ा थोडय़ा वेळानं, थोडं थोडंच खा.
4) वेफर्स, फराळी चिवडे, तेलकट वडे न खाणं उत्तम.
5) चहा -कॉफी जास्त पिऊ नका.
6) खूप वेळ पोट रिकामं ठेवू नका. रॅश डाएट करू नका.
7) जास्त गोड खाऊ नका.
8) सतत लिक्विड पदार्थ खाऊ नये, त्यानं शौचास त्रास होऊ शकतो.
8) पारंपरिक धान्य फराळ-भाज्या खाणं उत्तम.
10) शक्यतो बोलण्याचा, व्हॉट्सअॅपचा, सोशल मीडीयाचाही उपवास केला तर मनशांतीसाठी उत्तम.