चरबीयुक्त यकृत आजारामध्ये वीस वर्षात पाच पट वाढ  : डॉ. हर्षल राजेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 01:36 PM2019-04-20T13:36:10+5:302019-04-20T13:47:18+5:30

यकृताशी संबंधित आजाराने ग्रस्त किमान 5-10 रुग्ण दररोज दिसतात.

fats with liver disease five times increases in twenty years : Dr. Harshal Rajekar | चरबीयुक्त यकृत आजारामध्ये वीस वर्षात पाच पट वाढ  : डॉ. हर्षल राजेकर

चरबीयुक्त यकृत आजारामध्ये वीस वर्षात पाच पट वाढ  : डॉ. हर्षल राजेकर

Next
ठळक मुद्देचरबीयुक्त सामग्री असलेल्या व्यक्तींना सूजलेल्या यकृताच्या आजाराचा धोका अधिक मधुमेह, लठ्ठपणा आणि चरबी हृदयविकाराचा झटक्याचे कारणवजन नियंत्रित करणे आणि हिरव्या भाज्या आणि फळे महत्वाचे

पुणे:  निष्क्रिय जीवनशैली व आहारातील साखरेचे वाढते प्रमाण यामुळे शहरी भागात चरबीयुक्त यकृत रोग वेगाने पसरत आहे. येत्या काही वर्षांत या आजाराने प्रभावित लोकसंख्या वाढू शकते, अशी माहिती गॅस्ट्रो-इंटेस्टिनल सर्जन डॉ. हर्षल राजेकर यांनी दिली आहे. जागतिक यकृत दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रुग्णालयाच्या महाव्यवस्थापक डॉ. विजू राजन उपस्थित होत्या.डॉ. राजेकर म्हणाले, यकृताशी संबंधित आजाराने ग्रस्त किमान 5-10 रुग्ण दररोज दिसतात. गेल्या 20 वर्षांत ही संख्या पाच पट वाढली आहे. ब-याच प्रकरणांमध्ये प्रारंभिक अवस्थेत त्या रोगात कोणतीही चिन्हे दिसू शकत नाहीत आणि म्हणूनच तो अज्ञात राहतो. सामान्यत: एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये 5 टक्के चरबी असते. यकृताच्या मूळ वजनाच्या 5 ते 10 टक्के वजनाचे यकृत असेल तर अशा चरबीयुक्त सामग्री असलेल्या व्यक्तींना सूजलेल्या यकृताच्या आजाराचा धोका अधिक असतो. या रोगामुळे यकृतामध्ये चरबी जास्त प्रमाणात जमा होते आणि अल्कोहोलमुळे आजारी पडण्याचा धोका वाढू शकतो. मधुमेह, लठ्ठपणा आणि चरबी यकृत रोगाचे प्राणघातक मिश्रण एखाद्या व्यक्तीच्या हृदयविकाराच्या झटक्याचे कारण बनवतो. पायांना सूज येणे, ओटीपोटात वेदना किंवा पोटदुखी, तसेच कमी भूक, वजन कमी होणे, शारीरिक कमजोरी आणि थकवा ही रोगाची काही लक्षणे आहेत.या रोगाच्या प्रतिबंधक उपायांमध्ये 30-40 मिनिटे एरोबिक व्यायामाचा समावेश करावा. याव्यतिरिक्त आपण योगाचा पर्यायदेखील निवडू शकता. शरीराचे वजन नियंत्रित करणे आणि हिरव्या भाज्या आणि फळे यांसह स्वस्थ आहारात जीवनशैली व्यवस्थापनासाठी महत्वाचे आहे.  विटामिन ईचा वापर करुन मधुमेहावर अधिक चांगले नियंत्रण करता येते.  जे फॅटी लिव्हरच्या आजाराची शक्यता 90 टक्के कमी करते. यकृत अल्ट्रासोनोग्राफी, कम्प्युटेड टोमोग्राफी स्कैन, मैग्नेटिक रेजोनेंस इमेजिंग व कंट्रोल्ड अटेनुएशन पैरामीटर यासारख्या निदान चाचण्यांद्वारे चरबी यकृत आजार ओळखता येतो, असेही डॉ. हर्षल राजेकर यांनी सांगितले.

Web Title: fats with liver disease five times increases in twenty years : Dr. Harshal Rajekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.