Coronavirus : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण; भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांनी दिलं 'हे' उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 04:45 PM2022-03-19T16:45:21+5:302022-03-19T16:45:59+5:30

Coronavirus : ओमायक्रॉन या सब व्हेरिएंटमुळे युनायटेड किंगडम आणि इतर युरोपीय देशांमध्ये भीती निर्माण होत आहे.

fear of omicron sub variant will the fourth wave of corona come to india the health expert answered | Coronavirus : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण; भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांनी दिलं 'हे' उत्तर...

Coronavirus : ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे भीतीचे वातावरण; भारतात येणार कोरोनाची चौथी लाट? तज्ज्ञांनी दिलं 'हे' उत्तर...

Next

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंटनंतर (Omicron Variant)आता त्याच्या सब व्हेरिएंट BA.2 मुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. दक्षिण कोरियामध्ये एका दिवसात या सब व्हेरिएंटची 6 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 

ओमायक्रॉन या सब व्हेरिएंटमुळे युनायटेड किंगडम आणि इतर युरोपीय देशांमध्ये भीती निर्माण होत आहे. मात्र, भारतातील या सब व्हेरिएंट संबंधित धोक्याबद्दल आरोग्य तज्ज्ञ फारसे चिंतित नाहीत. याचे सर्वात मोठे कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाढलेली प्रतिकारशक्ती असल्याचे सांगितले जात आहे.भारतात गेल्या वर्षी डिसेंबर ते या वर्षी फेब्रुवारी दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढला होता. 

महाराष्ट्रातील राज्य आरोग्य सेवेचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले की, भारतात येणारी कोरोनाची चौथी लाट आपण हलक्यात घेऊ शकत नाही, कारण हा सब व्हेरिएंट जगातील अनेक देशांमध्ये पसरत आहेत. त्यामुळे देशात कोरोनाची चौथी लाट कधी येईल आणि ती किती गंभीर असेल हे सांगणे कठीण आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरस ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला होता. या व्हेरिएंटमध्ये 50 हून अधिक म्यूटेशन होते. दरम्यान, सुरुवातीला हा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य असल्याने भीती निर्माण झाली, परंतु नंतर गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे सर्व देशातील कोरोना लसीकरणामुळे घडले, ज्यामुळे मोठ्या लोकसंख्येची प्रतिकारशक्ती चांगली झाली.

महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी म्हणाले की भारतात कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता कमी आहे. इस्रायलमध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसचे नवीन व्हेरिएंट देखील चिंताजनक व्हेरिएंटच्या यादीत ठेवले नाहीत. त्यामुळेच, जोपर्यंत कोरोनाचा कोणताही गंभीर व्हेरिएंट समोर येत नाही, तोपर्यंत धोकादायक असे काही नाही. तरीही आपल्याला मास्क घालणे गरजेचे आहे. 

Web Title: fear of omicron sub variant will the fourth wave of corona come to india the health expert answered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.