सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच भूक लागते? जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 01:27 PM2024-06-29T13:27:32+5:302024-06-29T13:28:15+5:30

आज आपण असं का होतं हे जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला वेळीच सावध होऊन योग्य ते उपचार घेता येतील.

Feeling hungry right after waking up in the morning? Find out why... | सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच भूक लागते? जाणून घ्या कारण....

सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच भूक लागते? जाणून घ्या कारण....

बऱ्याच लोकांना रात्री पोटभर जेवण केल्यावरही सकाळी झोपेतून उठल्यावर लगेच भूक लागते. त्याशिवाय घसा कोरडा होऊन कमजोरी जाणवते. असं जर तुम्हालाही होत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. आज आपण असं का होतं हे जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला वेळीच सावध होऊन योग्य ते उपचार घेता येतील.

ब्लड शुगर लेव्हलसोबत संबंध

बऱ्याच लोकांना या समस्या होतात. सकाळी झोपेतून उठल्यावर त्यांना लगेच भूक लागते. रात्री पोटभर जेवण केल्यावरही त्यांना भूक लागते. सकाळी घसा कोरडा होता आणि कमजोरी जाणवते. असं होत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. कारण असं होण्याचा संबंध ब्लड शुगर लेव्हल आणि हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे होतं.

सकाळी उठताच भूक का लागते?

जेव्हा आपण रात्री जेवण करतो तेव्हा अचानक ब्लडमध्ये शुगरची लेव्हल वाढते. पण नंतर काही वेळाने अन्न पचन झाल्यावर हळूहळू कमी होते. शुगर लेव्हल कमी झाल्यावर पुन्हा भूक लागते. रात्रीच्या जेवणात जर जास्त मीठ खात असाल तर  शरीरात पाणी कमी होऊ लागतं. ज्यामुळे तुम्हाला तहान लागते आणि जोरात भूक लागते.

सकाळी उठताच प्या पाणी

'जर्नल न्यूट्रिएंट्स' च्या एका रिपोर्टनुसार, रात्री जेवण केल्यावर  पेनक्रियाजमध्ये जास्त इन्सुलिन बनतं. जास्त इन्सुलिन ब्लडमधील शुगर लेव्हल कमी करतं. तेच रात्री जर जास्त मीठ खाल्लं तर शरीरात पाणी कमी होतं. ज्यामुळे भूक लागते. अशात सकाळी झोपेतून उठल्यावर कमीत कमी २ ग्लास पाणी प्यावे.

रात्री लवकर जेवणं गरजेचं

सकाळी झोपेतून उठताच भूक लागणं हा काही आजार नाही. पण असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेऊ शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री जास्त उशीरा जेवण करू नका. रात्री उशीरा जेवण्याची सवय फार घातक आहे. झोपण्याच्या २ तास आधी जेवण करावं. तेव्हाच तुमचं जेवण चांगलं पचतं. तसेच सकाळी उठताच तुम्हाला भूक लागणार नाही.

जेवण केल्यावर अर्धा तास चालावं. जेवण केल्यावर चालल्याने जेवण चांगलं पचण्यास मदत मिळते. सोबतच याने पचन तंत्र चांगलं राहण्यास मदत मिळते. त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर केलं पाहिजे. जेणेकरून पचनासंबंधी समस्या होऊ नये.

Web Title: Feeling hungry right after waking up in the morning? Find out why...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.