पाणी पिऊनही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' कॅन्सर, वेळीच काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:24 PM2022-04-11T17:24:48+5:302022-04-11T17:40:07+5:30

जर वेळोवेळी भरपूर पाणी पिऊनही तुमची तहान भागत (feeling thirsty even after drinking water) नसेल, तर मात्र हे एका मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. काय आहे हा आजार आणि काय घ्यावी खबरदारी? जाणून घेऊ.

feeling thirsty even after drinking water can be symptoms of bowel cancer | पाणी पिऊनही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' कॅन्सर, वेळीच काळजी घ्या!

पाणी पिऊनही सतत तहान लागत असेल तर असू शकतो 'हा' कॅन्सर, वेळीच काळजी घ्या!

googlenewsNext

आपल्या शरीरातील छोटे-छोटे बदल आपल्या शरीराला असणाऱ्या संभाव्य मोठ्या धोक्यांपासून अलर्ट करतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. उन्हाळ्यात उष्णतेमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात घाम येतो, त्यामुळे शरीरातील बरंच पाणी बाहेर पडतं आणि वारंवार तहान लागते. या ऋतूमध्ये सारखी तहान लागणं ही खरं तर सामान्य बाब आहे. मात्र, जर वेळोवेळी भरपूर पाणी पिऊनही तुमची तहान भागत (feeling thirsty even after drinking water) नसेल, तर मात्र हे एका मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. काय आहे हा आजार आणि काय घ्यावी खबरदारी? जाणून घेऊ.

मोठ्या आजाराचं लक्षण
बऱ्याच वेळा मधुमेहाच्या (Diabetes symptoms) रुग्णांमध्ये अशाच प्रकारची लक्षणं दिसून येतात. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टर सर्वात आधी डायबेटिसची चाचणी करण्याचा सल्ला देतात. मात्र, डायबेटिस चाचणीचे रिपोर्ट नॉर्मल आले, तर मात्र हे लक्षण दुसऱ्या एका मोठ्या आजाराचं मानलं जातं. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही वारंवार तहान लागणं हे आतड्याच्या कॅन्सरचं (Bowel cancer symptoms) एक लक्षण समजलं जातं. त्यामुळे तुम्हालाही असा अनुभव येत असल्यास, वेळीच डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे.

बॉवेल कॅन्सरची इतर लक्षणं
बॉवेल कॅन्सर, म्हणजेच आतड्याचा कर्करोग (Bowel cancer signs) हा शरीरात अगदी कमी गतीने वाढतो. तसंच याची लक्षणंही बरीच उशीरा दिसून येतात. बऱ्याच वेळा याचे निदान होईपर्यंत भरपूर उशीर झालेला असतो. मात्र, तुम्ही छोट्या छोट्या लक्षणांकडे (Symptoms of bowel cancer) लक्ष दिले, तर वेळीच याच्या धोक्यापासून वाचू शकता. 'आज तक'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

भरपूर तहान लागण्याव्यतिरिक्त बॉवेल कॅन्सरची इतरही काही लक्षणं (Signs of bowel cancer) आहेत. यामध्ये शौचास येण्याच्या वेळेमध्ये बदल, शौचामध्ये रक्त येणं, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अस्वस्थ वाटणं, गुदद्वाराजवळ गाठ तयार होणं, अचानक वजन कमी होणं, कमी भूक लागणं, वारंवार लघवी लागणं, लघवीमध्ये रक्त येणं तसंच लघवीचा रंग बदलणं अशा लक्षणांचा समावेश होतो. यातील कोणतंही लक्षण दिसून आल्यास डॉक्टरांची भेट घेणं गरजेचं आहे.

कसा टाळाल बॉवेल कॅन्सर?
आतड्याचा कॅन्सर होण्याची काही प्रमुख कारणं (Causes of bowel cancer) आहेत. यामध्ये तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचा मोठा हात आहे. त्यामुळे काही सवयींमध्ये बदल करून, तुम्ही बॉवेल कॅन्सर होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी (How to avoid bowel cancer) करू शकता. अभ्यासात असं समोर आलं आहे, की रेड मीट आणि प्रोसेस्ड मीट खाणं, तसंच लो फायबर डाएटमुळे आतड्याच्या कॅन्सरचा धोका वाढतो. तसंच, दारूचं प्रमाणाबाहेर सेवन करणाऱ्यांमध्येही या कॅन्सरचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे या गोष्टी टाळून (Bowel cancer precautions) तुम्ही हा धोका कमी करू शकता.

या व्यतिरिक्त अधिक वजन असलेल्या, ६० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांच्या आई-वडिलांना या कॅन्सरची लागण झाली आहे अशा लोकांनाही बॉवेल कॅन्सर होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असतो. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करून, तसंच शरीरातील महत्त्वाच्या लक्षणांना वेळीच ओळखून तुम्ही आतड्यांच्या कर्करोगासारख्या मोठ्या आजाराला वेळीच रोखू शकता.

Web Title: feeling thirsty even after drinking water can be symptoms of bowel cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.