तळपायांमध्ये होत असेल जळजळ तर करू नका दुर्लक्ष, असू शकतात ही गंभीर कारणं...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 11:55 AM2022-12-01T11:55:30+5:302022-12-01T11:55:59+5:30

Feet Burn Problem: जर तुमच्याही तळपायांमध्ये जळजळ किंवा टोचल्यासारखं वाटत असेल अजिबात दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. सामान्यपणे ही समस्या रात्रीच्यावेळी अधिक होते. चला जाणून घेऊ याचं कारण...

Feet burn problem do not ignore the burning sensation in the feet this could be the reason | तळपायांमध्ये होत असेल जळजळ तर करू नका दुर्लक्ष, असू शकतात ही गंभीर कारणं...

तळपायांमध्ये होत असेल जळजळ तर करू नका दुर्लक्ष, असू शकतात ही गंभीर कारणं...

googlenewsNext

Feet Burn Problem: जर तुमच्या तळपायांमध्ये जळजळ किंवा टोचल्यासारखं वाटत असेल तर वेळी सतर्क होण्याची गरज आहे. अनेक लोक या समस्येला अजिबात गंभीरतेने घेत नाहीत आणि त्यांनी गंभीर आजाराचा सामना करावा लागतो. जर तुमच्याही तळपायांमध्ये जळजळ किंवा टोचल्यासारखं वाटत असेल अजिबात दुर्लक्ष करू नका आणि वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. सामान्यपणे ही समस्या रात्रीच्यावेळी अधिक होते. चला जाणून घेऊ याचं कारण...

हाय ब्लड शुगर

अनेक वर्षांपासून असलेली हाय ब्लड शुगर हळूहळू नसांना डॅमेज करते. हाय ब्लड शुगर नर्वसच्या संकेतांच्या ट्रांसमिशनला कमी करतं. ज्यामुळे शरीरातील नसा डॅमेज होऊ लागतात आणि योग्य ब्लड सर्कुलेशन होत नसल्याने पायांमध्ये जळजळ होऊ लागते.

हाय बीपी

जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्हाला तळपायांमध्ये जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. हाय बीपी झाल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वेगाने होतं. ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. हाय बीपीमुळे तुमच्या तळपायांमध्ये जास्त जळजळ होऊ शकते. यासोबतच इतरही काही समस्या होऊ शकते.

हाइपोथायरायडिज्म

हाइपोथायरायडिज्ममध्ये तुमचं शरीर थायरॉइड हार्मोनचं प्रोडक्शन योग्यपणे करत नाही. ज्यामुळे शरीरात अनेक कार्य हळू होतात आणि यामुळे शरीरातील ब्लड फ्लो सुद्धा प्रभावित होतो. या समस्येमुळे शरीरात वॉटर रिटेंशन आणि सूज येऊ लागते. ज्यामुळे पायांवरील नसांवर जोर पडतो आणि पायांमध्ये जळजळ होऊ लागते.

नसांमध्ये सूज

जर तुमच्या नसांमध्ये सूज असेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नसांमध्ये सूज असेल तर लिव्हर किंवा किडनीच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच तुमच्या लठ्ठपणामुळे पायांवर प्रेशर वाढतं. ज्यामुळे पायांमध्ये जळजळ जाणवू शकते. जर तुमच्या तळपायांमध्ये सतत जळजळ वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. जेणेकरून याचं नेमकं कारण कळेल आणि तुम्ही त्यावर योग्य उपचार घेऊ शकाल.

Web Title: Feet burn problem do not ignore the burning sensation in the feet this could be the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.