चिंताजनक! 'या' कारणामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी जास्त जीवघेणा ठरतोय कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:50 AM2020-09-02T11:50:27+5:302020-09-02T12:00:40+5:30
मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन हे कारण सुरूवातीला समोर आलं होतं. आता याबाबत नवीन माहिती समोर येत आहे.
कोरोना व्हायरसचं संक्रमण महिलांच्या तुलनेत पुरूषांसाठी अधिक जीवघेणं ठरत आहे. अनेक संशोधनातून महिलांसाठी तुलनेत पुरूषांच्या तुलनेत कोरोना विषाणू जास्त घातक ठरत आहे. असं दिसून आलं आहे. मेल हार्मोन टेस्टोस्टेरॉन हे कारण सुरूवातीला समोर आलं होतं. आता याबाबत नवीन माहिती समोर येत आहे. यात क्रोमोसोम्स, एसीई२ प्रोटीन्स आणि दैनंदिन जीवनातील काही गोष्टीबाबत खुलासा करण्यात आला आहेत.
एसीई-2 रिसेप्टर्स
कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि त्याचा मानवी शरीरावर पडणारा प्रभाव याबाबत रिसर्च सुरू आहे. तज्ज्ञांच्या टीमनं अशी अनेक कारण शोधली आहेत. त्यातून पुरूषांच्या शरीरात कोरोना विषाणू जलद गतीने का पसरतो याबाबत माहिती मिळते. त्यातील मुख्य कारण म्हणजे एसीई२ रिसेप्टर्स, हे रिसेप्टर्स एका प्रकारचे प्रोटिन्स असतात. या प्रोटीन्सना नियंत्रणात केल्यानंतर कोरोना विषाणू जलद गतीनं शरीरात पसरतो. महिलांच्या तुलनेत पुरूषांच्या तुलनेत रिसेप्टर्सचं प्रमाण जास्त असते.
एसीई२ रिसेप्टर्स ज्या लोकांच्या शरीरात जास्त प्रमाणात असलेल्या लोकांना हार्ट अटॅक किंवा डायबिटिजची समस्या असेल तर कोरोना संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते. गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाची लागण होत असलेल्या रुग्णांमध्ये डायबिटिस आणि हृदयासंबंधी आजार असलेल्याची संख्या जास्त आहे. फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थमध्ये हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे.
क्रोमोसोम्स
महिलांच्या शरीरात XX क्रोमोसोम्स असतात. तर पुरूषांच्या शरीरात XY क्रोमोसोम्स असतात. क्रोमोसोम्सवर लिंगाचे निर्धारण अवलंबून असते. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चमधून दिसून आलं की हे क्रोमोसोम्स रोगप्रतिकारकशक्तीला प्रभावित करतात. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी XX क्रोमोसोम्स जास्त परिणामकारक ठरतात.
हार्मोन्सची भूमिका
ज्या पुरूषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची कमतरता असते. त्यांना कोरोनाचं संक्रमण वेगानं होतं. या हार्मोनमुळे शरीरात व्हायरसचा प्रवेश झाल्यास फुफ्फुसांना आणि शरीराच्या काही भागाांना सूज येण्यापासून रोखता येतं. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण लोकसंख्येपैकी पुरूषांमध्ये धुम्रपान करणं, एल्कोहोलचं सेवन करणं आणि चुकिची जीवनशैली यांमुळे जीवनशैलीवर परिणाम होतो. परिणामी माहामारीच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन व्हायरसचा सामना करण कठीण होतं.
हे पण वाचा-
नाष्त्याला पोहे खाण्याचे 'हे' ५ आरोग्यदायी फायदे वाचाल; तर रोज आवडीनं खाल
खुशखबर! इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही उपचारांशिवाय मानवी शरीरानं केली HIV वर मात
कोरोनातून बरं झाल्यानंतर फुफ्फुसांसह 'या' अवयवांवर होत आहे गंभीर परिणाम; तज्ज्ञांचा दावा