तुमच्या घरातच आहे आयुष्य वाढवणारा उपाय, 'हे' पिऊनच जास्त जगायचे आधीचे लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:08 AM2024-06-20T10:08:19+5:302024-06-20T10:08:51+5:30

Fennel and Fenugreek water : अनेकांना असाही प्रश्न पडतो की, जुने लोक असं काय करून निरोगी आणि फीट राहत होते? किंवा जास्त काळ कसे जगत होते? याचं उत्तर आज जाणून घेऊया.

Fennel seeds and fenugreek seeds water will increase your life and save from many disease | तुमच्या घरातच आहे आयुष्य वाढवणारा उपाय, 'हे' पिऊनच जास्त जगायचे आधीचे लोक!

तुमच्या घरातच आहे आयुष्य वाढवणारा उपाय, 'हे' पिऊनच जास्त जगायचे आधीचे लोक!

Fennel and Fenugreek water :  पूर्वीच्या काळी लोक भरपूर आयुष्य जगायचे. तुम्हीही असे अनेक आजी-आजोबा पाहिले असतील जे १०० पेक्षा जास्त वर्ष जगतात. आधीच्या लोकांचं आरोग्यही चांगलं राहत होतं. पण आजकाल बदलत्या लाइफस्टाईल मुळे आणि वेगवेगळ्या आजारांमुळे लोकांचं आयुष्य कमी झालं आहे. कमी वयातच हृदयरोग, डायबिटीस, कॅन्सर असे गंभीर आजार होऊ लागले आहेत. अशात अनेकांना असाही प्रश्न पडतो की, जुने लोक असं काय करून निरोगी आणि फीट राहत होते? किंवा जास्त काळ कसे जगत होते? याचं उत्तर आज जाणून घेऊया.

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लवकर म्हातारपण येऊ लागलं आहे. हे लवकर येणारं म्हातारपण तुम्ही काही जुन्या लोकांच्या सवयी फॉलो करून रोखू शकता. एक खास उपाय करून तुम्ही आतून तरूण राहू शकता. आज हाच खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. न्यूट्रिशनिस्ट पलक नागपाल यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी या पाण्याचे फायदे सांगितले आहेत.

जास्त आयुष्य देणारं आयुर्वेदिक औषध

रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप आणि एक चमचा मेथीचे दाणे भिजवून ठेवा. हे पाणी रात्रभर असंच राहू द्या. सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी हे पाणी प्या. नंतर बडीशेप आणि मेथीचं दाणे चाऊन खा.

काय होतो फायदा

एक्सपर्ट सांगतात की, या खास पाण्यामध्ये ८७ तत्व असतात. जे बडीशेपमधून येतात. यांनी हृदयरोग, लठ्ठपणा, कॅन्सर, न्यूरोलॉजिकल डिजीज आणि टाइप २ डायबिटीसपासून बचाव करण्यास मदत मिळते. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी, अॅंटी-कॅन्सर, अॅंटी-मायक्रोबिअल, अॅंटी वायरल गुण असतात.

भूक कंट्रोल होईल

ब्लू झोनमध्ये राहणाऱ्या लोकांचं वय जास्त असतं. ते त्यांच्या भूकेपेक्षा २० ते ३० टक्के कमी खातात. बडीशेपचं पाणी भूक कंट्रोल करण्यास मदत करतं. त्यामुळे हे पाणी नियमितपणे पिऊन तुम्ही तुमचं आयुष्य वाढवू शकता.

डायबिटीसपासून बचाव

मेथीच्या दाण्यांचा वापरही औषधी म्हणून केला जातो. मेथीचे दाणे डायबिटीस दूर करण्यास मदत करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये फायबर भरपूर असतं. जे किडनी, नसा आणि डोळ्यांचा हाय ब्लड शुगरच्या नुकसानापासून बचाव करतं.

या पाण्याचे फायदे

बडीशेप आणि मेथीच्या दाण्यांचं हे पाणी पिऊन तुम्ही जॉइंट्समधील वेदना दूर करू शकता. तसेच मासिक पाणीमधील वेदना दूर करू शकता. याने तुमच्या डोक्याला शांतता मिळेल. इन्फेक्शनपासून बचाव होईल तसेच कोलेस्ट्रॉल आणि हार्ट बर्नपासूनही बचाव होईल.

Web Title: Fennel seeds and fenugreek seeds water will increase your life and save from many disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.