Diabetes tips: डायबिटीस रुग्णांनी 'या' पदार्थाचे केले 'अशापद्धतीने' सेवन तर शुगर झटपट होईल कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 04:33 PM2022-03-13T16:33:59+5:302022-03-13T16:39:10+5:30
परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अशी सवय असते की, जेवण जेऊन झाल्यावर ते बाडीशेप खातात. यामुळे जेवण जिरण्यात मदत होते असे देखील म्हटलं जातं. परंतु यामुळे होणारे आणखी फायदे तुम्हाला माहितीयत का? मधुमेहाच्या रुग्णांसाठी बडीशेप खुप महत्वाची आहे. ही या लोकांची साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्याचे काम करते.
मधुमेह नियंत्रण न ठेवल्यास शरीराच्या विविध भागांवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे लोक त्यांच्या जेवणावर नियंत्रण ठेवतात, तसेच औषधांचा अवलंब देखील करतात. पण याशिवाय, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही नैसर्गिक पद्धतीने तुमची साखरेची पातळी नियंत्रित करू शकता. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. चला जाणून घेऊया मधूमेहांच्या रुग्णांसाठी बडीशेप किती फायदेशीर आहे.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बडीशेप खूप गुणकारी
एका संशोधनानुसार, एका जातीची बडीशेप मधुमेहाच्या रुग्णांसाठी औषधासारखीच आहे. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. दुसरीकडे, बडीशेप बियांमध्ये फायटोकेमिकल्स असतात जे खूप शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट असतात. हे सर्व घटक शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधकतेची समस्या कमी करतात आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
मधुमेहाच्या रुग्णांनी अशा प्रकारे बडीशेपचे सेवन करावे
- मधुमेही रुग्ण चहामध्ये बडीशेप मिसळून प्या.
- यासाठी २५० मिली पाणी आणि ४ चमचे एका जातीची बडीशेप घ्या.
- यानंतर एका पातेल्यात पाणी घालून उकळी आणा.
- पाणी अर्धे झाल्यावर त्यात ४ चमचे बडीशेप टाका.
- लक्षात ठेवा की बडीशेप घातल्यानंतर पाणी जास्त वेळ उकळू नये.
- ते उकळल्यावर लगेच गॅस बंद करा आणि पाणी काही वेळ भांड्यात राहू द्या, त्यानंतर ते गाळून प्या.
- याशिवाय मधुमेही रुग्ण जेवल्यानंतर शक्य असल्यास एक चमचा बडीशेप देखील खाऊ शकतात.