हिवाळ्यात रोज सकाळी या पिवळ्या पाण्याचं करा सेवन, पोट आणि वजन होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 10:12 AM2023-12-07T10:12:49+5:302023-12-07T10:13:31+5:30

रोज सकाळी एक खासप्रकारचं पाणी पिण्यास सुरूवात केली तर तुमचं वजन लवकर कमी होऊ शकतं.

Fenugreek and fennel water benefits doctor verified | हिवाळ्यात रोज सकाळी या पिवळ्या पाण्याचं करा सेवन, पोट आणि वजन होईल कमी

हिवाळ्यात रोज सकाळी या पिवळ्या पाण्याचं करा सेवन, पोट आणि वजन होईल कमी

वाढलेलं वजन आणि बाहेर आलेल्या पोटाच्या समस्येने बरेच लोक हैराण आहेत. फिजिकली फीट असूनही त्यांचं वजन कमी होत नाही. अनेकदा डाएटमध्ये बदल करूनही काही खास फायदा होत नाही. काही लोक तर यासाठी ऑपरेशन सुद्धा करायला तयार असतात. पण रोज सकाळी एक खासप्रकारचं पाणी पिण्यास सुरूवात केली तर तुमचं वजन लवकर कमी होऊ शकतं. आम्ही तुम्हाला सांगतोय मेथी आणि बडीशेपच्या पाण्याबाबत. या दोन गोष्टींपासून बनलेलं पाणी शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. चला जाणून घेऊ याचे फायदे.

- आधी एक चमचा बडीशेप, 1 चमचा मेथी 1 कप पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा.

- सकाळी मेथी आणि बेडीशेप गाळून वेगळी काढा. पाण्याचं सेवन करा. जर तुम्हाला हे पाणी कडवट लागत असेल तर यात थोडं मध टाका.

- पाणी प्यायल्यानंतर तुम्ही मेथीचे दाणे आणि बडीशेप चाऊन खाऊ शकता. याने पचन चांगलं होतं.

बॉडी डिटॉक्स

रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी बडीशेप आणि मेथीचं पाणी प्यायल्याने शरीर चांगल्या प्रकारे डिटॉक्स होतं. शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर निघतात. पण ही बाब लक्षात की, हे पाणी 15 दिवसांपेक्षा जास्त लागोपाठ पिऊ नये.

इम्यूनिटी बूस्टर

मेथी आणि बडीशेपमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंटचं भरपूर प्रमाण असतं. त्यामुळे हे एका चांगल्या इम्यूनिटी बूस्टरच्या रूपात काम करतं. मेथी-बडीशेपचं पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

पचन तंत्र

मेथी आणि बडीशेपचं पचन तंत्रासाठी रामबाण असतं. याने पोट साफ राहतं आणि पचनाची क्रिया सोपी बनवतं. हे प्यायल्याने बद्धकोष्ठता, अॅसिडीटी आणि ब्लोटिंगसारख्या समस्या लवकर दूर होतात.

वजन कमी होतं

नियमित रूपाने मेथी-बडीशेपचं पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. याने वजन कमी करण्याची प्रक्रिया सोपी होते. अधिक फायद्यासाठी मेथी-बडीशेपचे दाणे चाऊन खाऊ शकता. 

Web Title: Fenugreek and fennel water benefits doctor verified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.