सर्वगुणधर्मांनी उपयुक्त, आजपासूनच करा आहारात मेथीचा समावेश, कसा ते जाणून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 11:25 AM2022-11-02T11:25:00+5:302022-11-02T11:41:48+5:30

थंडी सुरु झाली की आहारात बदल आपोआपच होतो. थंड पदार्थ बाजूला होतात आणि गरम पदार्थच खायची इच्छा होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार हिवाळ्यात मेथी खूप फायदेशीर ठरते.

fenugreek seeds improves digestive problems, controls cholesterol and sugar level | सर्वगुणधर्मांनी उपयुक्त, आजपासूनच करा आहारात मेथीचा समावेश, कसा ते जाणून घ्या...

सर्वगुणधर्मांनी उपयुक्त, आजपासूनच करा आहारात मेथीचा समावेश, कसा ते जाणून घ्या...

Next

थंडी सुरु झाली की आहारात बदल आपोआपच होतो. थंड पदार्थ बाजूला होतात आणि गरम पदार्थच खायची इच्छा होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार हिवाळ्यात मेथी खूप फायदेशीर ठरते. मेथी मुळात उष्ण आणि चवीला कडवट असल्याने आरोग्यासाठी अत्यंत पोषक आहे. मेथीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि महत्वाचे म्हणजे लोह मुबलक प्रमाणात आढळते. बहुतांश लोकांमध्ये लोहाची कमतरता जाणवते, विशेषत: महिलांमध्ये लोहाचे प्रमाण कमी असते. यासाठी मेथीचे सेवन फायदेशीर आहे. 

वेगवेगळ्या माध्यमातून करा मेथीचे सेवन 

१ किंवा २  चमचे मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी उठल्यावर त्याचे पाणी रिकाम्यापोटी पिणे.

मेथीची भाजी, ज्यूस किंवा पराठे हिवाळ्यात आपल्या डाएटमध्ये अवश्य असावेत.

मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी मेथीच्या दाण्यांची पावडर नियमित खावी

मेथीचे नेमके फायदे काय

पचनसंस्था सुधारण्यास मदत

दररोजच्या थकाथकीच्या जीवनात अनेकांना पचनाचा त्रास जाणवतो. त्यांच्यासाठी मेथी हा रामबाण उपाय आहे. मेथीमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. मेथीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे पचनासाठी उपयुक्त आहे. 

मधुमेह आणि ब्लड प्रेशरवर नियंत्रण 

मधुमेही रुग्णांसाठी मेथी नक्कीच लाभदायक आहे. साखर आणि कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यासाठी मेथीची पावडर खावी, असा सल्ला वैद्यांनी देतात.

ब्लड प्रेशर आणि सतत थकवा येत असेल तर मेथीचे दाणे लाभदायक आहेत.

सर्दी खोकल्यापासून आराम

थंडीच्या दिवसांत सर्दी खोकला होणे स्वाभाविक असते. अशावेळी जास्त त्रास होऊ नये म्हणून मेथीचा आहारात समावेश करणे योग्य ठरते.

Web Title: fenugreek seeds improves digestive problems, controls cholesterol and sugar level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.