पोटावरील चरबी गायब होऊन दिसाल स्लीम, मेथीच्या दाण्यांचं रोज 'असं' करा सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:22 PM2024-10-21T15:22:14+5:302024-10-21T15:22:54+5:30

Fenugreek seeds benefits : आज आम्ही तुम्हाला शरीरातील चरबी कमी करून वजन कंट्रोल ठेवण्याचा एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. तो म्हणजे मेथीचे दाणे.

Fenugreek seeds will melt your belly fat know how to consume it | पोटावरील चरबी गायब होऊन दिसाल स्लीम, मेथीच्या दाण्यांचं रोज 'असं' करा सेवन!

पोटावरील चरबी गायब होऊन दिसाल स्लीम, मेथीच्या दाण्यांचं रोज 'असं' करा सेवन!

Fenugreek seeds benefits : आजकाल वेगवेगळ्या कारणांनी जगभरातील लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. एकदा जर लोक लठ्ठपणाचे शिकार झाले तर शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. सोबतच पोट बाहेर आल्याने तुम्हाला अनेक समस्याही होतात. अशात आज आम्ही तुम्हाला शरीरातील चरबी कमी करून वजन कंट्रोल ठेवण्याचा एक नॅचरल उपाय सांगणार आहोत. तो म्हणजे मेथीचे दाणे.

मेथीच्या दाण्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. मेथीचे दाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मेथीच्या दाण्यांच्या मदतीने तुम्ही लठ्ठपणाही कमी करू शकता. यासाठी मेथीच्या दाण्यांचं सेवन कसं करावं आणि याचे काय फायदे होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मेथीमधील पोषक तत्व

मेथीच्या दाण्यांमध्ये सॉल्यूबर फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. फायबरशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये कॉपर, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी6, सी, के, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉलिक अॅसिड असतं. जे शरीराला भरपूर फायदे देतात. 

कसं बनवाल मेथीचं पाणी?

तुम्ही मेथीचं पाणी दोन पद्धतीने बनवू शकता. पहिली पद्धत म्हणजे एक कप किंवा एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी थोडं गरम करून गाळून घ्या आणि पाण्याचं सेवन करा. 

दुसरा उपाय म्हणजे सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकून उकडा. हे पाणी गाळून घ्या आणि सेवन करा. तसेच आपल्या हर्बल टी मध्ये टाकूनही याचं सेवन करू शकता. भिजवलेल्या किंवा शिजलेल्या मेथीचे दाणे तुम्ही चावून खाऊ शकता.

मेथीच्या दाण्यांचे इतर फायदे

1) बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथीचे दाणे 2 ग्लास पाण्यात टाकून उकडू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत हे उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.

2) मेथीच्या दाण्यांच्या पाण्याचं सेवन नियमितपणे केलं तर याने पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात. 

3) अनेक लोकांना रात्री लवकर किंवा चांगली झोप येत नाही. जर तुम्हाला रात्री चांगली झोप येत नसेल तर तुम्ही मेथीच्या दाण्यांचं पाणी पिऊ शकता. याने तुम्हाला रात्री चांगली झोप येईल.

4) मेथीच्या दाण्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हलही संतुलित करण्यास तसेच किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते.

5) तसेच मेथीच्या दाण्यांमुळे डायबिटीसची समस्या दूर करण्यास आणि हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास व केस चांगले ठेवण्यास मदत मिळते.

6) मेथीच्या पाण्याने फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचं सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावं.

Web Title: Fenugreek seeds will melt your belly fat know how to consume it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.