दुध आणि दह्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो का? जाणून घ्या संशोधन काय सांगते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 06:50 PM2022-06-16T18:50:23+5:302022-06-16T18:54:01+5:30

आपले हृदय हळू हळू कमकुवत आणि आजारी होत जाते. अशावेळी घरातच उपलब्ध असणारे काही पदार्थ आपल्याला हृदयाच्या समस्यांपासून दूर ठेऊ शकतात. जाणून घेऊया ते कोणते पदार्थ आहेत.

Fermented Dairy Items Like Sour Milk And Yogurt Can Protect Against Heart Attack study | दुध आणि दह्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो का? जाणून घ्या संशोधन काय सांगते

दुध आणि दह्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो का? जाणून घ्या संशोधन काय सांगते

googlenewsNext

कोरोनामुळे झालेल्या तासानंतर आता सर्वजण आपल्या आरोग्याकडे अगदी बारकाईने लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्याच्या काळात आजारपण काढण्यापेक्षा आधीच सावधगिरी बाळगणे योग्य आहे. आपल्या घरात अनेक असे पदार्थ किंवा काही वस्तू असतात ज्या आपल्याला अनेक मोठ्या होऊ शकणाऱ्या त्रासांपासून मुक्त करू शकतात. मात्र धावत्या काळात आपल्याला स्वतःकडे फारसं लक्ष देता येत नाही आणि ताण वाढत आहे. या वाढत्या तणावाचा परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. आपले हृदय हळू हळू कमकुवत आणि आजारी होत जाते. अशावेळी घरातच उपलब्ध असणारे काही पदार्थ आपल्याला हृदयाच्या समस्यांपासून दूर ठेऊ शकतात. जाणून घेऊया ते कोणते पदार्थ आहेत.

शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व आपल्याला काही प्रमाणात दुधापासून मिळत असतात. दूध (Milk) आणि दुग्धजन्य पदार्थ (Dairy Products) आपल्या आतड्यांच्या स्वास्थ्यासाठी उत्तम असल्याचे मानले जाते. ते आपली पचनक्रिया सुधारून पोटाच्या अनेक समस्यांपासून आपल्या मुक्त करतात. मात्र या आंबवलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा (Fermented Dairy Products) आणखी फायदा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका अभ्यासानुसार, असे आढळून आले आहे की, हे आंबवलेले दुग्धजन्य पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यांसाठी चांगले असतात आणि ते हृदयविकारापासून आपले संरक्षण करू शकतात. चीज, दही आणि नासलेले दूध (Cheese, Yogurt And Sour Milk Can Reduce Risk Of Heart Attack) यासारखे आंबवलेले दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने हृदयविकारापासून आपला बचाव होऊ शकतो.

E Times मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ ईस्टर्न फिनलंडने केलेल्या एका संशोधनात आणि ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, फर्मन्टेड डेअरी प्रोडक्ट्स कमी प्रमाणात खाणाऱ्या लोकांपेक्षा हे प्रोडक्ट्स जास्त प्रमाणात खाणाऱ्या लोकांमध्ये कोरोनरी हृदयरोगाचा धोका कमी असतो. तज्ज्ञांच्या मते चीज आणि दही बनताना होणारी किण्वन प्रक्रिया (Fermentation Process) हृदय निरोगी बनवण्यास मदत करते. मात्र याचा फायदा असला तरीही कोणत्याही पदार्थांचे सेवन प्रमाणातच केले गेले पाहिजे.

Web Title: Fermented Dairy Items Like Sour Milk And Yogurt Can Protect Against Heart Attack study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.