.....म्हणून माणसांआधी 'या' प्राण्याला देण्यात आली होती कोरोनाची लस

By Manali.bagul | Published: January 7, 2021 06:27 PM2021-01-07T18:27:30+5:302021-01-07T18:34:24+5:30

CoronaVaccine News and latest Updates : मागील उन्हाळ्यात 210 काळ्या पायाच्या फेरेट्सना प्रायोगिक कोरोना लस दिली गेली. फोर्ट कोलिन्स जवळ असलेल्या नॅशनल ब्लॅक फूट कन्झर्वेशन सेंटरमध्ये या लसी देण्यात आल्या.

Ferrets endangered animals get experimental corona vaccine at science |  .....म्हणून माणसांआधी 'या' प्राण्याला देण्यात आली होती कोरोनाची लस

 .....म्हणून माणसांआधी 'या' प्राण्याला देण्यात आली होती कोरोनाची लस

googlenewsNext

(Imge Credit- Getty) 

कोरोना लस मिळावी म्हणून जगभरातील लोक प्रतीक्षा करत आहे, पण एक जीव असा आहे. ज्याला माणसांआधी कोरोनाची लस देण्यात आली आहे. या प्राण्याच्या प्रजाती धोक्यात आहेत, म्हणून कोरोनाची लस प्रथम दिली गेली आहे. हा जीव बहुधा अमेरिकेतील कोलोरॅडो येथे मोठ्या प्रमाणात आढळतो. या सुंदर जीवबद्दल जाणून घेऊया ज्याला मनुष्यांपूर्वी कोरोनाची लस दिली गेली होती.

फेरेट्स असे या प्राण्याचे नाव आहे. मुस्टेला निग्रीपिस या प्राण्याच्या जातीचे नाव आहे. ही मुंगूसाची एक प्रजाती आहे जी अमेरिकेत सामान्यत: दिसून येते . मागील उन्हाळ्यात 210 काळ्या पायाच्या फेरेट्सना प्रायोगिक कोरोना लस दिली गेली. फोर्ट कोलिन्स जवळ असलेल्या नॅशनल ब्लॅक फूट कन्झर्वेशन सेंटरमध्ये या लसी देण्यात आल्या.

संरक्षण केंद्राच्या म्हणण्यानुसार फेरेट्समध्ये कोरोनाची प्रकरणे नोंदली गेलेली नाहीत. परंतु त्यांना अशा व्हायरसने सहज संसर्ग होऊ शकतो. म्हणून, त्यांना यापूर्वीच कोरोना लस देण्यात आली होती. जीवशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार या लसी अशा जीवांवर वापरासाठी सुरू केल्या आहेत ज्यांच्या प्रजाती धोक्यात आहेत.

Ferrets get experimental corona vaccine

चार दशकांपूर्वी फेरेट्सची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या, तेव्हा त्यांना व्योमिंगमध्ये परत सोडण्यात आले. त्यांचे प्रजनन केले गेले जेणेकरुन हे प्राणी पृथ्वीवर टिकू शकतील. तेव्हापासून, त्यांच्या प्रजाती धोक्यात आहेत, परंतु नामशेष झाल्या नाहीत.

लसणाच्या फक्त २ पाकळ्यांनी मुलांची सर्दी, खोकल्याची समस्या होईल दूर; 'असा' करा वापर

फेरेट्स आणि मिन्क्स दोन्ही एकाच जातीचे प्राणी आहेत. दोघेही जवळचे नातेवाईक आहेत. मिन्क्समध्ये कोरोनाची प्रकरणे सापडली, त्यानंतर अमेरिकेच्या अनेक राज्ये आणि युरोपियन देशांमध्ये त्यांची हत्या झाली. फेरेट्समध्ये लागण झाल्यानंतर कोरोना व्हायरसने  म्यूटेशन करू नये अशी तज्ज्ञांची इच्छा होती.  कारण त्यांच्या शरीरातील उत्परिवर्तनानंतर व्हायरस किती धोकादायक होईल हे त्यांना माहिती नाही.

हिवाळ्यात स्वेटर घालून झोपणं ठरू शकतं घातक; 'या' समस्यांशी करावा लागू शकतो सामना 

सिएटलस्थित संसर्गजन्य रोग संशोधन संस्थेचे लसीकरण तज्ज्ञ  कोरी कॅस्पर म्हणतात की, ''अशा प्रकारच्या व्हायरसमुळे प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो, पृथ्वीवरील अशा जीवांचे रक्षण केले पाहिजे. या जीवांना पकडून लसीकरण करणे देखील खूप कठीण काम आहे. आपण माणसांना आता लस देऊन त्यांचे संरक्षण केले तरी भविष्यात कोरोना व्हायरसनं म्यूनटेशन केल्यास अधिक धोका उद्भवू शकतो.  लस कितपत संरक्षण देईल, याबाबत आता सांगणं कठीण आहे.''

Web Title: Ferrets endangered animals get experimental corona vaccine at science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.