डेंग्यू झाला असेल तर रामबाण उपाय ठरतं हे फळ, जाणून घ्या याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:39 AM2023-10-26T10:39:40+5:302023-10-26T10:41:53+5:30
डेंग्यू बरा करण्यासाठी रूग्णांना खासप्रकारची डाएट फॉलो करावी लागते. ज्यात वेगवेगळी फळं आणि भाज्यांचा समावेश असतो.
डेंग्यू एक असा आजार आहे जो डास चावल्यामुळे होतो. हा आजार डेंग्यू व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस डासांच्या शरीरात राहतो आणि डास आपल्याला चावला तर व्हायरस आपल्या शरीरात येतो. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे डेंग्यूची लक्षणं इन्फेक्शन झाल्यावर 3-14 दिवसांमध्ये दिसतात. काही केसेसमध्ये डेंग्यू गंभीर असतो. गंभीर डेंग्यूमध्ये जास्त ब्लीडिंग, लो ब्लड प्रेशर आणि ऑर्गन फेलिअरसारख्या समस्याही होतात.
डेंग्यू बरा करण्यासाठी रूग्णांना खासप्रकारची डाएट फॉलो करावी लागते. ज्यात वेगवेगळी फळं आणि भाज्यांचा समावेश असतो. यातीलच एक खास फळ म्हणजे कीवी. हे फळं असतं छोटं पण याचे फायदे खूप जास्त असतात. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, पोटॅशिअम आणि फायबरसारखे पोषक तत्व असतात. याने डेंग्यूची लक्षणं कमी करण्यास मदत मिळते.
कीवीमध्ये फायबर असतं जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. डेंग्यूमध्ये पचनासंबंधी समस्या होते. जसे की, बद्धकोष्ठता. अशात कीवीचं सेवन केलं तर ही समस्या दूर होते. डेंग्यूमुळे शरीरात सूज येते, ज्यामुळे वेदना आणि थकवा येतो. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई च्या मदतीने ही समस्या दूर होते.
कीवी खाण्याचे फायदे
पचन चांगलं होतं - कीवीमध्ये फायबर भरपूर असतं. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. याने बद्धकोष्ठता रोखण्यास मदत मिळते आणि पचन तंत्र चांगलं राहतं.
इम्यूनिटी बूस्टर - कीवीमध्ये व्हिटॅमिन सी असतं. जे एक शक्तीशाली अॅंंटी-ऑक्सिडेंट आहे. व्हिटॅमिन सी मुळे इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं. याने इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळते.
हृदय चांगलं राहतं - कीवीमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं. जे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं. पोटॅशिअम हृदयसाठी महत्वाचं आहे आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास याने मदत मिळते.
कॅन्सरचा धोका कमी होतो - कीवीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट असतात जे कोशिकांचं नुकसान होण्यापासून रोखतात. अॅंटी-ऑक्सिडेंट कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.
त्वचा आणि केस - कीवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर असतं. जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी महत्वाचं असतं. व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन बनवण्यास मदत करतं. याने तुमची त्वचा तरूण दिसते. तर व्हिटॅमिन ई मुळे केस निरोगी आणि चमकदार दिसतात.