गरम पाणी, सिगारेट किंवा चहा कशानंही पोट साफ होत नाहीये? 'या' भाज्या खाऊन लगेच व्हाल हलके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:41 IST2025-02-07T15:38:52+5:302025-02-07T15:41:18+5:30
Constipation Home Remedies : पोट साफ झालं नाही तर कशातही मन लागत नाही आणि पोटासंबंधी इतरही समस्या होतात. बद्धकोष्ठतेची समस्या झाल्यावर पोट जड होतं, गॅस तयार होता आणि टॉयलेटला गेल्यावर वेदना होतात.

गरम पाणी, सिगारेट किंवा चहा कशानंही पोट साफ होत नाहीये? 'या' भाज्या खाऊन लगेच व्हाल हलके!
Constipation Home Remedies : पोट साफ न होणे म्हणजे बद्धकोष्ठता ही एक कॉमन समस्या आहे. कोणत्याही वयाच्या लोकांना ही समस्या होऊ शकते. आतड्या योग्यपणे काम करत नसल्यावर ही समस्या होते. पोट साफ झालं नाही तर कशातही मन लागत नाही आणि पोटासंबंधी इतरही समस्या होतात. बद्धकोष्ठतेची समस्या झाल्यावर पोट जड होतं, गॅस तयार होता आणि टॉयलेटला गेल्यावर वेदना होतात.
न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार, ही समस्या दूर करण्यासाठी फायबर फार महत्वाचं असतं. फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. यानं विष्ठा मुलायम होते आणि पोट सहजपणे साफ होतं. तसेच आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरियाही वाढतात.
फायबर कशातून मिळवाल?
खाण्याच्या भरपूर गोष्टींमध्ये फायबर असतं. जास्त प्रमाणात फायबर मिळवण्यासाठी काही भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. फायबर असलेल्या भाज्या खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. चला जाणून घेऊ कोणत्या भाज्या ठरतात फायदेशीर...
हिरवे मटार
हिरव्या मटारमध्ये ५.७ ग्रॅम फायबर असतं. हिरव्या मटारमध्ये फायबर आणि प्लांट प्रोटीन भरपूर असतं. यानं पचन चांगलं होण्यास मदत मिळते, ब्लड शुगर नियंत्रित राहते आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि आवश्यक पोषक तत्व मिळतात. नियमितपणे हे खाल्ल्यास पोट साफ न होण्याची समस्या होणार नाही.
फुलकोबी
फुलकोबीमध्ये २ ग्रॅम फायबर असतं. फुलकोबी एक कमी कॅलरी असलेली भाजी आहे, ज्यात भरपूर फायबर असतं. यानं पचनास मदत होते आणि पोट भरलेलं राहतं. वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास ही भाजी खूप मदत करते. तसेच यातून व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेट्सही भरपूर मिळतात.
पालक
पालक भाजीमध्येही भरपूर प्रमाणात फायबर असतं. पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर भाजी आहे. ही भाजी पचन संतुलित ठेवते आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवते. या भाजीतून भरपूर प्रमाणात आयर्न सुद्धा मिळतं. यात अनके व्हिटॅमिन्स, खनिज आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जर तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या नेहमीच होत असेल तर पालक खाऊ शकता.
ब्रोकली
ब्रोकलीमध्येही भरपूर प्रमाणात फायबर असतं. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्सही असतात. या भाजीनं पचन चांगल्याप्रकारे होण्यास मदत मिळते. आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरिया वाढतात. तसेच आतड्यांवरील सूज कमी होते आणि वजनही कमी होतं.