आता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी

By manali.bagul | Published: September 24, 2020 06:10 PM2020-09-24T18:10:11+5:302020-09-24T18:13:16+5:30

CoronaVirus News & Latest updates : कुत्र्यांच्या मदतीनं कोरोनाची चाचणी कशी करता येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

Finland deploys coronavirus sniffing dogs at airport as way to detect infection | आता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी

आता कुत्र्यांच्या मदतीने कोरोना चाचणी होणार; 'अशी' केली जाणार तपासणी

Next

गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं कहर केला आहे. दिवसेंदिवस जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  वाढती रुग्णसंख्या कधी कमी होणार याबाबत कोणालाही कल्पना नाही. अनेक ठिकाणी शरीराचं तापमान तपासून, स्बॅब टेस्ट  करूनच कोरोनाची चाचणी केली जात आहे.  आता कुत्र्याद्वारे कोरोनाची चाचणी करण्यासाठी फिनलँडने पुढाकार घेतला आहे. कुत्र्यांच्या मदतीनं कोरोनाची चाचणी कशी करता येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

फिनलँडमधील नॉर्डियाकच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे कुत्रे वास घेऊन समोरची व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही याचा तपास  करू शकणार आहेत. हेलसिंकी विमानतळावर वेगवेगळ्या प्रजातींचे चार कुत्रे तैनात केले आहेत. या कुत्र्यांना त्यांना Finlands Smell Detection Association ने ट्रेनिंग दिलं आहे. कुत्र्यांच्या मदतीनं कोरोनाच्या रुग्णांचा शोध घेणारा फिनलँड हा UAE नंतरचा दुसरा देश आहे. विमानतळावर प्रवासी  आल्यानंतर लगेचच त्यांना या कुत्र्यांच्या मदतीनं तपासलं जाणार आहे. मात्र जर प्रवासी स्वतःहून  इतर माध्यमातून  चाचणी करण्याासाठी तयार असेल तर कुत्र्यांच्या माध्यमातून  तपासणी केली जाणार नाही. 

कोरोना चाचणी करण्यासाठी ही पद्धत सगळ्यात सोपी, स्वस्त आणि विश्वासू समजली जात आहे. व्हेंटा या शहराचे उपमहापौर टिमो आरोनकीटो यांनी याविषयी माहिती देताना सांगितलं, ' या पद्धतीसाठी जवळपास 3 लाख युरो खर्च येणार असून, इतर टेस्टिंगच्या तुलनेत हा खर्च खूप कमी आहे. त्यामुळं आम्ही या पर्याय निवडला आहे.'ET, Kossi, Miina आणि  Valo अशी या कुत्र्यांची नावं आहेत.  

कुत्र्याद्वारे अशी केली जाते चाचणी

प्रवासी विमानतळावर आल्यानंतर  त्यांच्या त्वचेच्या वरच्या थराचा नमुना घेतला जातो. त्यानंतर एका बाटलीमध्ये भरून हा नमुना या कुत्र्यांकडे दिला जातो. त्यानंतर १० सेकंद वास घेतल्यानंत व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कुत्रा विशिष्ट हावभावांद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे भुंकून, पायाचा पंजा घासून किंवा लोळून ते आपला निष्कर्ष सांगतात. या टेस्टमध्ये व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली तर त्याला कोरोनाची टेस्ट करायला सांगितलं जातं. यातून कुत्र्यांचा निष्कर्ष कितपत बरोबर आहे  हे पाहिलं जातं. सध्या हा नवीन प्रयोग कितपत यशस्वी ठरतो हे पाहिलं जाणार आहे. 

जपानमध्येही कोरोना नष्ट करण्यासाठी  नवीन डिव्हाईस लॉन्च

जपानमधील एका कंपनीने अल्ट्राव्हायोलेट (Ultraviolet) लॅम्प लाँच केला आहे. या लॅम्पचा उपयोग कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच, याचा मानवी शरीरावर कोणताही परिणाम होणार होत नाही, असेही कंपनीने म्हटले होतं. यासाठी पारंपारिक अल्ट्राव्हायोलेट लॅम्पचा उपयोग केला जात नाही, कारण यामुळे त्वचेचा कर्करोग आणि डोळ्यांची समस्या उद्भवू शकते. परंतु नवीन लॅम्पमध्ये कर्करोग रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. अशाप्रकारचे हे जगातील पहिले उपकरण मानले जात आहे. ही यूव्ही किरणे मानवी शरिरासाठी हानिकारक नाहीत. या यूव्ही लॅम्पची किंमत सुमारे 2 लाख 10 हजार रुपये असल्याचे कंपनीने म्हटले होते.

हे पण वाचा-

खुशखबर! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार

वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...

Web Title: Finland deploys coronavirus sniffing dogs at airport as way to detect infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.