इथे औषधांनी नाही तर शरीरावर आग लावून केले जातात उपचार, १०० वर्षांपासून सुरू आहे प्रथा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:37 PM2019-09-18T12:37:52+5:302019-09-18T12:48:04+5:30

तुम्ही रूग्णाच्या शरीरावर आग लावून त्याच्या आजारावर उपचार करताना कुणाला पाहिलंय का? नाही ना?

Fire therapy in China sets patients up in flames to cure chronic illness | इथे औषधांनी नाही तर शरीरावर आग लावून केले जातात उपचार, १०० वर्षांपासून सुरू आहे प्रथा! 

इथे औषधांनी नाही तर शरीरावर आग लावून केले जातात उपचार, १०० वर्षांपासून सुरू आहे प्रथा! 

Next

(Image Credit : Social Media)

आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या औषधांनी आणि जडी-बुटींनी आजारांवर उपचार करताना डॉक्टरांना पाहिलं असेल. पण कधी तुम्ही रूग्णाच्या शरीरावर आग लावून त्याच्या आजारावर उपचार करताना कुणाला पाहिलंय का? नाही ना? चीनमध्ये आजही हा आग लावून आजार बरा करण्याचा उपचार केला जातो. हा उपचार गेल्या १०० पेक्षा अधिक वर्षांपासून चीनमध्ये वापरला जातो.

या उपचाराला 'फायर थेरपी' असं म्हणतात. चीनमध्ये वेगवेगळ्या उपचारांसाठी ही फायर थेरपी वापरली जाते. याप्रकारे लोकांवर उपचार करण्यासाठी झांग फेंगाओ हे फारच लोकप्रिय आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, व्यक्तीच्या शरीरावर एवढी आग लागल्यावर त्यांना काहीच होत नसेल का? तर चला जाणून घेऊ या उचाराबाबत....

(Image Credit : nydailynews.com)

चीनमध्ये काही लोक फायर थेरपीला खास प्रकारचा उपचार मानतात. ज्याने तणाव, डिप्रेशन, पोटदुखी आणि इन्फर्टिलिटीपासून ते कॅन्सरपर्यंतचा उपचार शक्य असल्याचा दावा केला जातो.

झांग फेंगाओ बीजिंगच्या एका छोट्या अपार्टमेंटमध्ये ही अनोख्या थेरपी लोकांवर उपचार करतात. एका वेबसाइटनुसार,  आधी रूग्णाच्या पाठीवर एक आयुर्वेदिक लेप लावला जातो. आणि नंतर एका टॉवेलने त्यांना झाकलं जातं. नंतर त्यांच्यावर पाणी आणि अल्कोहोल शिंपडून रूग्णाच्या शरीरावर आग लावली जाते. 

उपचाराची ही पद्धत चीनच्या प्राचीन मान्यतांवर आधारित आहे. ज्यानुसार शरीरात उष्णता आणि थंड यांच्यात सामंजस्य बसवण्यावर जोर दिला जातो. झांग फेंगाओ यांच्यानुसार, शरीराच्या वरचा भाग गरम करण्यासाठी आतील थंडावा दूर केला जातो.

फायर थेरपीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. यातील महत्वाचा म्हणजे हे उपचार करणाऱ्यांकडे सर्टिफिकेट आहे की नाही. उपचारादरम्यान काही दुर्घटना झाली तर सुरक्षा व्यवस्था आहे की नाही. यावर झांग फेंगाओ यांचं म्हणणं आहे की, अनेकदा लोकांना जखमही होते. अनेकदा लोकांचा चेहरा किंवा इतर अवयव भाजले जातात. पण हे सगळं या उपचाराची योग्य पद्धत न वापरल्याने झालं आहे. मी हजारो लोकांवर फायर थेरपी केली आहे, पण कधीच काही वाईट घटना घडली नाही.

झांग फेंगाओ सांगतात की, फायर थेरपी ही मानवी इतिहासातील चौथी सर्वात मोठी क्रांति आहे. या थेरपीने चीनी आणि पाश्चिमात्य दोन्ही प्रकारच्या उपचार पद्धतींना मागे सोडलं आहे. गंभीर आजारांसाठी अनेकांना भरमसाठ खर्च करावा लागतो, जे प्रत्येकाला शक्य नसतं. अशात फायर थेरपी त्यांच्यासाठी फायदेशीर आणि स्वस्त ठरते.

Web Title: Fire therapy in China sets patients up in flames to cure chronic illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.