देशात नेटफ्लिक्स अॅडिक्शनची पहिली केस, १२ तास व्हिडीओ पाहत होता तरुण!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 12:18 PM2018-11-02T12:18:07+5:302018-11-02T12:19:26+5:30
फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनंतर आता यूजर्सना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि हॉटस्टारसारख्या अॅप्सच्या अॅडिक्शनची समस्या होत आहे.
(Image Credit : thenewsminute.com)
फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनंतर आता यूजर्सना नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि हॉटस्टारसारख्या अॅप्सच्या अॅडिक्शनची समस्या होत आहे. नेटफ्लिक्सची सवय लागल्याची पहिली केस बंगळुरुमध्ये समोर आली आहे. येथील एका २६ वर्षीय तरुणाला दिवसातील १० ते १२ तास नेटफ्लिक्सवर व्हिडीओ बघितल्याने ही सवय लागली आहे. त्याचा परिणाम असा झाला की, या तरुणाला रुग्णालयात दाखल करावं लागलंय.
नेटफ्लिक्सची लागलेली सवय सोडवण्यासाठी तरुणावर बंगळुरु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल हेल्थ अॅन्ड न्यरोसायंसमध्ये उपचार सुरु आहेत. या तरुणावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले की, साधारण ६ महिन्यांपूर्वी तरुणाची नोकरी सुटली होती. यादरम्यान त्याला नेटफ्लिक्सवर व्हिडीओ बघण्याची सवय लागली.
हळूहळू ही सवय इतकी वाढली की, तो दिवसातून १०-१० तास नेटफ्लिक्सवर आणि काही इतरही प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पाहू लागला होता. या तरुणाच्या आई-वडिलांनी डॉक्टरांना सांगितले की, जेव्हा इतका वेळ व्हिडीओ बघण्यावरुन त्याला आम्ही खटकलं तेव्हा तो चिडचिड करायचा, रागवायचा आणि आक्रामक होत होता.
यावर भारतात २ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या नेटफ्लिक्सने यावर काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. तर डॉक्टरांचं म्हणनं आहे की, तरुण पिढी मल्टिपल स्क्रीन डिसऑर्डरे ग्रस्त होत आहे. म्हणजे त्यांना सतत कोणती ना कोणती स्क्रीन हवी असते. मग ती कम्प्युटर असो, लॅपटॉप असो वा टॅबलेट किंवा मोबाइल असो.
८२६ व्हिडीओसोबत सुरु झालं होतं नेटफ्लिक्स
- नेटफ्लिक्स २ वर्षांपूर्वी ८२६ व्हिडीओसोबत सुरु झालं होतं. आता त्यांच्याकडे साधारण ४, ७०६ व्हिडीओ आहेत.
- व्हिडीओ कन्टेन्ट इंडस्ट्री वर्षांला १४ टक्क्यांनी वाढत आहे.
- २०१७ मध्ये जगभरातील लोक एक दिवसातील सरासरी ५६ मिनिटे वेळ ऑनलाइन व्हिडीओ बघण्यात घालवतात.
- हाच वेळ २०१८ मध्ये वाढून ६७ मिनिटांपेक्षा जास्त झाला आहे.