गुड बॅक्टेरिया करणार बॅड बॅक्टेरियाचा नाश, नोज ड्रॉपने जीवघेण्या संक्रमणापासून होणार बचाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 10:53 AM2018-12-18T10:53:03+5:302018-12-18T19:20:23+5:30

आता चांगले बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियाच्या संक्रमणापासून तुमचा बचाव करणार. कारण ब्रिटनच्या संशोधकांनी एक असं नोज ड्रॉप तयार केलंय ज्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरिया आहेत.

First nose drop contains good bacteria prevent deadly meningitis in UK | गुड बॅक्टेरिया करणार बॅड बॅक्टेरियाचा नाश, नोज ड्रॉपने जीवघेण्या संक्रमणापासून होणार बचाव!

गुड बॅक्टेरिया करणार बॅड बॅक्टेरियाचा नाश, नोज ड्रॉपने जीवघेण्या संक्रमणापासून होणार बचाव!

googlenewsNext

आता चांगले बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियाच्या संक्रमणापासून तुमचा बचाव करणार. कारण ब्रिटनच्या संशोधकांनी एक असं नोज ड्रॉप तयार केलंय ज्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरिया आहेत. जे मेनिनजायटिसचं संक्रमण रोखण्यासाठी मदत होईल. हे ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चच्या साउथॅम्पटन बायोमेडिकल रिसर्च सेंटरने तयार केलं आहे. जगात पहिल्यांदाच अशाप्रकारचा ड्रॉप तयार करण्यात आला आहे. नुकतीच या ड्रॉपची ट्रायलही घेण्यात आली आहे. 

संशोधकांनुसार, ड्रॉपमध्ये खास प्रकारचा बॅक्टेरिया आहे जो संक्रमणापासून लढण्याचं काम करतो. मेनिनजायटिस म्हणजेच मेंदुत ताप जाणे हा एक संक्रमण आजार आहे. हा आजार कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो. पण याची सर्वात जास्त लागण ही नवजात बाळांना आणि लहान मुलांना होते. हा आजार बॅक्टेरिया आणि व्हायरसमुळे परसतो. अनेकदा या आजारावर उपचार करण्यास उशीर झाला तर तो जीवघेणाही ठरु शकतो. 

संशोधकांनुसार, निसेरीया लेटक्टमिका नावाचा बॅक्टेरिया नाकाव्दारे होणाऱ्या संक्रमणापासून बचाव करतो. मेनिनजायटिस या आजाराचं कारण असणाऱ्या निसेरिया बॅक्टेरियापासून बचाव करतो. तरुणांमध्ये साधारण १० टक्के असे बॅक्टेरिया आढळतात, जे मेनिनजायटिससाठी कारणीभूत ठरतात. हे खासकरुन नाक आणि घशात असतात. अनेकदा हे रक्तात मिळून जीवाला धोकाही निर्माण करतात. त्यासोबतच या बॅक्टेरियामुळे ब्लड पॉयजनिंगची समस्याही होते. याला सेप्टिसीमिया म्हटलं जातं. 

ब्रिटनमध्ये या आजाराने दरवर्षी १५०० लोक मरतात

ब्रिटनमध्ये दरवर्षी बॅक्टेरियाने होणाऱ्या मेनिंगोकोकल मेनिनजायटिसने साधारण १५०० लोकांचा मृत्यू होतो. साउथॅम्पटन बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे निर्देशक रॉबर्ट यांच्यानुसार, असे आढळले आहे की, नाकात निसेरिया लेटक्टमिक बॅक्टेरिया असल्याने याचा इम्यून रिस्पॉन्स फार वाढतो आणि याने नुकसान करणारे जिवाणू रोखले जाऊ शकतात. असे अनेक रुग्णांमध्ये आढळले सुद्धा आहे. असे बॅक्टेरिया वाढवून रोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो. 

प्राध्यापक रीड म्हणाले की, 'नाकात ड्रॉप टाकून संक्रमण रोखण्याची पद्धत भविष्यात थेरपीप्रमाणे असेल. याच्या मदतीने नाकाद्वारे शरीरात पसरणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी केला जाईल. यात निमोनिया आणि कानांशी संबंधित आजारांचाही समावेश आहे'.

काय आहे मेनिंगोकोकल मेनिनजायटिस

निसेरिया मेनिंजायटिडीस बॅक्टेरियाला मेनिंगोकोकल सुद्धा म्हटले जाते. हे शरीरात जाऊन त्वचा, आहार नलिका, श्वसननलिकेत संक्रमण पसरवतात. अनेकदा बॅक्टेरिया रक्ताच्या माध्यमातून मेंदूतही पोहचतात आणि याने जीवाला धोका निर्माण होतो. अचानक जास्त ताप, सतत डोकेदुखी, मानेमध्ये दुखणे आणि उलटी यांसारख्या समस्या बघायला मिळतात. त्वचेवर लाल चट्टे होणे हे संक्रमणाचं लक्षण आहे. 
 

Web Title: First nose drop contains good bacteria prevent deadly meningitis in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.