पहिल्या पावसाच्या पाण्यात अॅसिड असतं?; जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 04:23 PM2019-06-10T16:23:23+5:302019-06-10T16:31:47+5:30
सध्या सर्वजण पावसाच्या आगमनाची प्रतिक्षा करत आहेत. कडाक्याच्या उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी कधी एकदा पावसामध्ये जाऊन भिजतोय असं झालं असेल. पण तुम्हाला आठवतयं का? पहिल्या पावसात भिजणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, कारण पहिल्या पावसाच्या बरसणाऱ्या सरींमध्ये अॅसिड असतं. हे तुम्ही लहानपणी एकदातरी ऐकल असेलचं.
सध्या सर्वजण पावसाच्या आगमनाची प्रतिक्षा करत आहेत. कडाक्याच्या उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी कधी एकदा पावसामध्ये जाऊन भिजतोय असं झालं असेल. पण तुम्हाला आठवतयं का? पहिल्या पावसात भिजणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं, कारण पहिल्या पावसाच्या बरसणाऱ्या सरींमध्ये अॅसिड असतं. हे तुम्ही लहानपणी एकदातरी ऐकल असेलचं. पण प्रदूषणातील सर्व तत्व एकत्र झाल्याने पाणी अॅसिडीक होण्याची बाब पूर्णतः चूकीची आहे. अनेकदा लोकांचा असा समज होतो की, पहिल्या पावसाच्या पाण्यामध्ये अॅसिड असतं.
लखनौ यूनिवर्सिटीतील जिऑलॉजी विभागाचे प्रोफेसर विभूति राय यांनी आपल्या संशोधनातून पावसाच्या पाण्याबाबतचा हा गैरसमज दूर केला आहे. प्रो. विभूति राय यांनी केलेल्या संशोधनानुसार, पहिल्या पावसाच्या पाण्यामध्ये आरोग्यासाठी घातक असं कोणतचं तत्व आढळून आलं नाही. एवढचं नाही तर हे पाणी पिण्यासाठीही अत्यंत शुद्ध असल्याचं सिद्ध झालं.
प्रो, विभूति राय यांनी 'रेन वॉटर केमिस्ट्री इन लखनौ'वर संशोधन केलं. यासाठी शहरातील 26 ठिकाणांवरील पहिल्या पावसाचं पाणी वैज्ञानिक पद्धतींनी एकत्र केलं. पाण्याच्या या नुमन्यांच्या तपासणीमध्ये कोणतीच कमतरता आढळून आली नाही. या पाण्यामध्ये एल्कालाइन मोठ्या प्रमाणात आढळून आलं, पण एवढं जास्तही नाही की, ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. पण तरिही पावसाळ्यात काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक असतं.
पावसाळा म्हणजे, वाफळणारा चहा.... खिडकीबाहेर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणि गाणी... किंवा मग पावसामध्ये चिंब भिजणं... अनेकांच्या आवडी यापेक्षा वेगळ्या असू शकतात. पण हे खरं असलं तरिही पावसात भिजताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असतं. तुम्हीही पावसात भिजण्याचे शौकीन असाल, तर आरोग्याची काळजी घ्या आणि भिजल्यानंतर काही टिप्स नक्की ट्राय करा...
1. जर तुम्ही पावसामध्ये भिजत असाल तर प्रयत्न करा की, तुमचे केस जास्त भिजू देऊ नका. कारण त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. एवढचं नाही तर सर्दी होण्यासाठीही हे कारण ठरू शकतं. यासाठी तुम्ही हेअर मास्क किंवा पॉलिथिनचाही आधार घेऊ शकता. त्यामुळे तुम्ही भिजण्याचा आनंद घेऊन आरोग्याची काळजीही घेऊ शकता.
2. भिजल्यानंतर घरी आल्यावर लवकरात लवकर कपडे बदलून व्यवस्थित अंग कोरडं करून कोरडे कपडे परिधान करा. शक्य असल्यास शरीराला ऊब द्या. त्यामुळे थंडी वाजणार नाही आणि सर्दी, तापापासून सुटका होइल.
3. जर पावसात भिजताना चुकूनही केस ओले झाले, तर लगेच कोरडे करा. टॉवेल आणि हेअर ड्रायरच्या मदतीने केस व्यवस्थित कोरडे करा. यामुळे केस खराब होणार नाहीत आणि सर्दीही होणार नाही.
4. पावसात भिजल्यानंतर घरी आल्यानंतर हळदीचं दूध किंवा आल्याचा चहा अथवा गरम गरम कॉफी प्या. ताप आणि सर्दी होण्यापासून बचाव करण्यासाठी तसेच शरीराला आतून ऊब देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
5. तुम्हाला गरज असेल तर गरमागरम व्हेजिटेबल सूप तयार करून पिऊ शकता. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते आणि शरीराला ऊब मिळते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.