सुरक्षित रक्त जळगावात प्रथमच गोळवलकर ब्लड बँकेत २७ पासून सुविधा

By admin | Published: January 26, 2016 12:04 AM2016-01-26T00:04:34+5:302016-01-26T00:04:34+5:30

जळगाव- जगातील सर्वात सुरक्षित व नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त नागपूर व्यतिरिक्त विदर्भ व खान्देशात प्रथमच माधवराव गोळवलकर ब्लड बँकेत दि.२७ जानेवारीपासून उपलब्ध होत आहे. अशी माहिती प्रकल्प प्रमुख व ज्येष्ठ रक्तरोग तज्ज्ञ डॉ.विवेकानंद कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी दि.१ जानेवारीपासून नवीन जागेत चित्रा चौक, जे.एम.पी. मार्केट, कोंबडीबाजाराजवळ येथे स्थलांतरित झाले आहे. या जागेचे औपचारिक उद्घाटन व नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त वितरण प्रारंभ या कार्यक्रमास आयोजन २७ जानेवारी सायंकाळी ५.३० वा. केले जाणार आहे. उद्घाटन सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सुदर्शन नवाल यांच्याहस्ते होणार आहे.

For the first time in Safe blood Jalgaon, there are 27 facilities in Golwalkar Blood Bank | सुरक्षित रक्त जळगावात प्रथमच गोळवलकर ब्लड बँकेत २७ पासून सुविधा

सुरक्षित रक्त जळगावात प्रथमच गोळवलकर ब्लड बँकेत २७ पासून सुविधा

Next
गाव- जगातील सर्वात सुरक्षित व नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त नागपूर व्यतिरिक्त विदर्भ व खान्देशात प्रथमच माधवराव गोळवलकर ब्लड बँकेत दि.२७ जानेवारीपासून उपलब्ध होत आहे. अशी माहिती प्रकल्प प्रमुख व ज्येष्ठ रक्तरोग तज्ज्ञ डॉ.विवेकानंद कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी दि.१ जानेवारीपासून नवीन जागेत चित्रा चौक, जे.एम.पी. मार्केट, कोंबडीबाजाराजवळ येथे स्थलांतरित झाले आहे. या जागेचे औपचारिक उद्घाटन व नॅट तंत्रज्ञानाने तपासलेले रक्त वितरण प्रारंभ या कार्यक्रमास आयोजन २७ जानेवारी सायंकाळी ५.३० वा. केले जाणार आहे. उद्घाटन सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सुदर्शन नवाल यांच्याहस्ते होणार आहे.

Web Title: For the first time in Safe blood Jalgaon, there are 27 facilities in Golwalkar Blood Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.