फिट असा, फोफशे असा किंवा हडकुळे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 04:18 PM2017-05-08T16:18:04+5:302017-05-08T16:18:04+5:30

या पाच गोष्टी फक्त तुमच्यासाठी. करा तुमचा फिटनेस प्लान स्वत:च्या स्वत:च.

Fit, foam or bush .. | फिट असा, फोफशे असा किंवा हडकुळे..

फिट असा, फोफशे असा किंवा हडकुळे..

Next

  - मयूर पठाडे

 
आपलं वजन का वाढतं, आपण एवढे फोफशे का आहोत, काहीच का आपल्याला झेपत नाही? याचं मुख्य कारण म्हणजे एकतर आपण ‘बशे’ आहोत, आपल्या देहाचं काही चलनवलनच होत नाही आणि दुसरं कारण म्हणजे आपलं डाएट. उठसुट फक्त पोटात ढकलत राहिल्यावंर दुसरं होणार तरी काय? त्यासाठी व्यायाम तर करायलाच हवा, पण तो हवा आपल्या ‘मनासारखा’. त्यानं आपल्याला आनंद मिळायला हवा. त्यासाठी आपल्या फिटनेसचं प्लॅनिंग आपल्याला स्वत:लाच करायला हवं.
 
कसा कराल आपल्या फिटनेसचा प्लॅन?
अगदी सोप्पय.
 

 
1- तुम्हाला काय आवडतं?
तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्यायाम आवडतो, त्यापासूनच सुरुवात करा. व्यायाम झाल्यावर एक प्रo्न स्वत:ला दररोज विचारा. आजचा एक्सरसाइज तुम्ही एन्जॉय केलात का? उत्तर जर नकारात्मक आलं तर व्यायामाचा प्रकार बदला. जोपर्यंत आपल्याला खरोखर त्यापासून एन्जॉयमेंट मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवा. 
 
2- तुमची पर्सनॅलिटी तपासा
तुमच्या फिटनेस लेव्हलसाठी तुमची पर्सनॅलिटी अत्यंत महत्त्वाची आहे, हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण ते खरोखर अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर एकट्यानंच आनंद करायचं असेल तर तुम्ही घरीही व्यायाम करू शकता. एकांतात आपलाआपला व्यायाम करू शकता, ट्रेकिंग, हायकिंग, सायकलिंग, वॉकिंग असे पर्याय निवडू शकता, पण तुम्हाला जर व्यायामासाठी कंपनी लागत असेल, इतरांमुळे तुम्ही मोटिव्हेट होत असाल, तुमच्यासाठी जिम हा चांगला पर्याय आहे. एरोबिक्स आणि डान्ससारखे पर्यायही त्यासाठी उपलब्ध आहेत.
 
3- चकटफू व्यायाम
जिममध्ये जाऊन व्यायाम करायलाही आजकाळ बक्कळ पैसा लागतो. तुमची ऐपत असेल, इच्छाही असेल तर तसं करायला काहीच हरकत नाही, पण तुमची जर सुरुवात असेल तर फुकटातल्या व्यायामापासून स्टार्ट करायला काहीच हरकत नाही. त्याने अनेक गोष्टी साध्य होतील. फक्त एक करा. आपल्या घरापासूनच सुरुवात करता येईल. घरातून बाहेर पडल्याबरोबर घड्याळात पाहा. दहा मिनिटं चालत जा. दहा मिनिटांनंतर मागे फिरा आणि परत चालत घरी या. सुरुवातीला ही वीस मिनिटंही तुम्हाला फोकस्ड आणि हेल्दी ठेवण्यासाठी पुरेशी ठरतील. 
 
4- तुमचा फिटनेस गोल
- फिटनेसच्या बाबतीत तुमचं ध्येय काय आहे, हे आधी निश्चित करा. तुम्ही जर आधीच चांगल्या शेपमध्ये असाल, तर वेगवेगळ्या अँक्टिव्हिटीजमधून आनंद मिळवण्याचा प्रय} करा. तुम्ही जर व्यायामाला नव्यानंच सुरुवात केली असेल किंवा केवळ हेल्दी राहाणं हेच तुमचं ध्येय असेल तर सुरुवात अतिशय हळू करा, पण त्यात सातत्य ठेवा. सोप्या प्रकारचा व्यायाम करा. नंतर अवघड आणि वजनी व्यायामाकडे वळा. आठवड्यातून फक्त तीन दिवस आणि पंधरा मिनिटे चालण्यापासूनही तुम्ही सुरुवात करू शकता.
 
5- मेडिकल इश्यूज?
तुम्हाला अगोदरच काही आजारपण असेल, काही दुखापती झाल्या असतील, सिझेरियनचं ऑपरेशन झालेलं असेल, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला केव्हाही उत्तम.

Web Title: Fit, foam or bush ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.