FITNESS : ​जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर कोणत्या हेल्थ ड्रिंक्स घ्यायच्या माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 11:36 AM2017-07-20T11:36:40+5:302017-07-20T17:06:40+5:30

काही फिटनेस ट्रेनरांनी जिमनंतर सेवन करण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्स सुचविले असून त्यांच्या वापराने नक्कीच फायदा होण्यास मदत होईल.

FITNESS: Do you know which health drinks you get after working hard at the gym? | FITNESS : ​जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर कोणत्या हेल्थ ड्रिंक्स घ्यायच्या माहित आहे का?

FITNESS : ​जिममध्ये मेहनत घेतल्यानंतर कोणत्या हेल्थ ड्रिंक्स घ्यायच्या माहित आहे का?

googlenewsNext
लिब्रिटींसारखे फिट शरीर कोणाला नको असते. बहुतेक सेलेब्स आपले फिटनेस टिकविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात. जिमबरोबर त्यांचा योग्य डायट प्लॅनही ठरलेलाच असतो. असे म्हटले जाते की, फक्त जिममध्ये घेऊन फारसा फरक पडत नाही. जिममध्ये मेहनत घेत असताना पौष्टिक आहाराचीही भूमिका महत्त्वाची असते. काही फिटनेस ट्रेनरांनी जिमनंतर सेवन करण्यासाठी काही हेल्दी ड्रिंक्स सुचविले असून त्यांच्या वापराने नक्कीच फायदा होण्यास मदत होईल. 

बाजारात उपलब्ध हवाबंद पेयांमध्ये प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात. यामध्ये साखरेचे प्रमाणही अधिक असते. अशावेळी जिमनंतर लगेच यांचे सेवन केल्यास लाभ होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. या पेयांमध्ये कृत्रिम रंग व फ्लेवर्स टाकल्यामुळे अधिक नुकसान होते. त्यामुळे घरी बनवलेले पेय पदार्थ हेल्दी व स्वस्त असतात. 

आपणही वर्क आऊट करीत असाल तर काही ड्रिंक्स सुचविले असून त्यांच्या सेवनाने अधिक फायदा होऊ शकतो.  

* संत्री व गाजरचा ज्यूस
संत्री व गाजरचा ज्यूस यामध्ये विटॅमिन सी व ई भरपूर प्रमाणात असते. सकाळच्या जिमनंतर हे ज्यूस घेतल्यास आपली सकाळ ऊर्जार्वान बनण्यास मदत होते शिवाय यामुळे आपणास संपूर्ण दिवसभर फ्रेश वाटेल. 

* चॉकलेट ड्रिंक 
जिममधून आल्यानंतर चॉकलेट ड्रिंक्स घेतल्यास त्यातील कॅफिनचा सकारात्मक फायदा आपल्या शरीरावर होतो. शिवाय यामध्ये फळांची साखर मिसळलेली असते. याचा थंड सुगंध तुम्हाला फ्रेश बनवतो. 

* मॅपल सिरप
मॅपल सिरप पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते. तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाणही वाढत नाही. या पदार्थात सोडियम असते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर हा सिरप पिऊ नका. 

* बनाना ड्रिंक आणि गव्हाचा तृणरस 
बनाना ड्रिंकसोबत आरोग्यासाठी स्वास्थवर्धक गव्हाचा तृणरस फेटून एकत्र करुन घेतल्यास फायदेशीर ठरते. हे मिश्रण जिमनंतर घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

Also Read : ​Fitness : बॉडी बनविण्यासाठी आहारात असावेत ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
                   : ​Health : ​वजन वाढविण्यासाठी ‘या’ हेल्दी पदार्थांचा करा वापर !

Web Title: FITNESS: Do you know which health drinks you get after working hard at the gym?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.