​Fitness : ‘सिक्स पॅक्स’बनविण्यासाठी "हा" आहे अगदी सोपा व्यायाम प्रकार !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 12:36 PM2017-10-03T12:36:33+5:302017-10-03T18:11:31+5:30

सिक्स पॅक्स बनविण्यासाठी जिममध्ये विविध प्रकारचे व्यायाम शिकविले जातात. त्यातील एक अगदी सोपा आणि प्रभावी व्यायाम प्रकार म्हणजे ‘प्लँक’ होय.

Fitness: "This" is the easiest exercise type to make six packs! | ​Fitness : ‘सिक्स पॅक्स’बनविण्यासाठी "हा" आहे अगदी सोपा व्यायाम प्रकार !

​Fitness : ‘सिक्स पॅक्स’बनविण्यासाठी "हा" आहे अगदी सोपा व्यायाम प्रकार !

googlenewsNext
ल्या आवडत्या अभिनेत्यासारखे ‘सिक्स पॅक्स’ आपलेही असावेत असे प्रत्येक तरुणाला वाटते. त्यानुसार तरुणांकडून तसे प्रयत्नही केले जातात. सिक्स पॅक्स बनविण्यासाठी जिममध्ये विविध प्रकारचे व्यायाम शिकविले जातात. त्यातील एक अगदी सोपा आणि प्रभावी व्यायाम प्रकार म्हणजे ‘प्लँक’ होय.  
हाताची कोपरे आणि पावले, यांच्यावर शरीराचा संपूर्ण भार तोलण्याला ‘प्लँक’ म्हणतात. यामुळे पोटाच्या स्नायूंचे टोनिंग होऊन पोटावरील अतिरिक्त चरबी नाहीशी होण्यास मदत मिळते. तसेच शरीरातील इतर अवयवांनाही प्लँक मुळे लाभ होतो.

प्लँक मुळे पायांना चांगला आकार मिळण्यास मदत होते. प्लँक केल्याने कंबरेपासून ते पावलांपर्यंत सर्वच स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. हे स्नायू सक्रीय होऊन त्यांच्यावरील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. परिणामी आपले पाय बळकट दिसू लागतात. प्लँक चा सर्वात जास्त परिणाम जाणवतो, तो पोटाच्या स्नायूंवर. या व्यायामप्रकारामुळे पोटाच्या स्नायूंवर ताण येऊन ते सक्रीय होतात. तसेच पोटावरील जमा झालेली अतिरिक्त चरबी देखील नियमित प्लँक केल्याने कमी होते.



प्लँक केल्याने शरीराचा मेटाबोलिक रेट वाढून शरीरातील कॅलरीज त्वरेने खर्च केल्या जातात. त्यामुळे अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. व्यायाम करणे थांबविल्याच्या पुष्कळ वेळानंतर पर्यंत कॅलरीज खर्च होत राहतात, इतका हा व्यायामप्रकार प्रभावी आहे. प्लँक केल्याने शरीराचे पोश्चर सुधारण्यास ही मदत मिळते. 

नियमित प्लँक केल्याने स्नायूंची लवचिकता वाढते. प्लँक या व्यायामप्रकाराने संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. हाताच्या पंजांवर आणि पावलांवर शरीराचा भार तोलूनही प्लँक करता येतो. या व्यायामाने बाकी शरीराबरोबर हाताचे आणि खांद्यांचे स्नायू व सांधे बळकट होण्यास मदत मिळते. ज्या व्यक्तींना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी प्लँक नियमित, पण थोड्याच वेळाकरिता करावा. एका वेळेला वीस ते तीस सेकंद प्लँक करावे. तीस सेकंद प्लँक करून मग काही क्षणांची विश्रांती घ्यावी, आणि परत वीस सेकंद प्लँक करावा. असे चार ते पाच वेळा केल्याने लाभ होतो.

Also Read : ​​Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !
                    : Six Pack बनविण्यासाठी आहाराची अशी घ्या काळजी !


Web Title: Fitness: "This" is the easiest exercise type to make six packs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.