Fitness : रोज फक्त ३० मिनिट व्यायाम केल्याने मिळतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 06:51 AM2017-08-29T06:51:36+5:302017-08-29T12:22:56+5:30
रोज किमान ३० मिनिट व्यायाम केल्यास कित्येक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया त्या फायद्यांबाबत...
Next
नेहमी अॅक्टिव्ट राहणे जणू सेलिब्रिटींचे कामच आहे. यासाठी ते कितीही व्यस्त असतील तरी वेळात वेळ काढून नियमितपणे वर्कआउट करतात आणि हेल्दी लाइफस्टाइल मिळवितात. रोज किमान ३० मिनिट व्यायाम केल्यास कित्येक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊया त्या फायद्यांबाबत...
* शरीरास ऊर्जा मिळते
संपूर्ण दिवस आपण घर आणि आॅफिसमध्ये काम करून एवढे थकतो की आपल्याजवळ ऊर्जाच शिल्लक राहत नाही. जर आपणास अशावेळी थकवा जाणवत असेल तर फक्त अर्धा तास फिजिकल एक्झरसाइज करुन आपण पुन्हा एनर्जेटिक फिल करु शकता. एक्झरसाइज केल्याने शरीरातील पेशींना आवश्यक पोषक तत्त्वे आणि आॅक्सिजन मिळतो ज्यामुळे आपली अॅनर्जी लेव्हल वाढते.
* ह्रदयासाठी फायदेशीर
रोज अर्धा तास व्यायाम केल्याने आपण अॅक्टिव्ह होतो ज्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएलचा स्तर वाढण्यास मदत होते आणि अनहेल्दी ट्रायग्लिसराइड आपोआप कमी होतात. यामुळे ह्रदय आणि ब्लड प्रेशरसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय अर्ध्या तासाच्या व्यायामाने ह्रदयापर्यंत रक्त प्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे आपणास कॉर्डियोवैस्कुलरसंबंधी समस्या निर्माण होत नाही.
* ताण-तणावापासून मुक्तता
जर आपण पूर्ण दिवस तणावात असाल तर फक्त अर्धा तास व्यायाम करुन तणावमुक्त होऊ शकता. फिजिकल एक्झरसाइजमुळे नॉरपिनाफ्रिन नावाच्या ब्रेन केमिकलची मात्र वाढते ज्यामुळे तणावाशी लढण्यास मदत होते. जसजसी या ब्रेन केमिकलची मात्रा वाढते तसतसा मानसिक ताण कमी होतो.
* मेमरी स्ट्रॉँग होते
मेमरी आणि फिजिकल एक्झरसाइज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जेवढा व्यायाम कराल तेवढ्या जास्त प्रमाणात मेमरीच्या भागात सेल्सची निर्मिती होते. यांना हिप्पोकॅम्पस म्हणतात. यामुळे आपली विचार, स्मृती आणि शिकण्याची क्षमता वाढते.
* वजन घटण्यास मदत होते
जर आपण वजन घटविण्यासाठी खूप मेहनत करीत असाल तर रोज फक्त अर्धा तास व्यायाम करु न वजन कमी करु शकता. हा अगदी सोपा उपाय आहे. नियमित व्यायामाने आपली अॅनर्जी लेवल नियमित राहते ज्यामुळे आपण संपूर्ण दिवस फिजिकली अॅक्टिव्ह राहतो. यामुळे अतिरिक्त खाल्ले जात नाही आणि वजन वाढत नाही.
* मधुमेहाचा धोका कमी होतो
रोज व्यायाम केल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते ज्यामुळे शरीरातील पॅँक्रियाजचे कार्य सुरळीत होते. यामुळेच शरीरात इन्शुलिनची निर्मिती चांगल्याप्रकारे होते आणि टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो.
Also Read : Health : जिममध्ये न जाता घरीच बनवा पिळदार शरीर, करा हे उपाय !
: SMART TIPS : बॉडी बनविण्यासाठी गरज नाही खूप मेहनतीची, या टिप्सदेखील आहेत महत्वाच्या !