Fitness : जीममध्ये जात असाल तर या ‘६’ गोष्टींचा संकोच नकोच !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 10:49 AM2017-09-09T10:49:44+5:302017-09-09T16:19:44+5:30
संकुचित मनाने जर वर्कआउट केले तर आपले उद्दिष्टे सफल होणार नाही. यासाठी जीममध्ये जाताना या सहा गोष्टींचा संकोच अजिबात नकोच.
Next
आ लीही बॉडी सेलिब्रिटीसारखी फिट असावी असे आजच्या तरुणांना वाटते, यासाठी ते जीमदेखील जॉइन करतात. मात्र जेव्हा एखाद्या मोठ्या व नामांकीत जीममध्ये प्रथमच जातात तेव्हा तिथे त्यांना संकोचल्यासारखे वाटते. अशा वातावरणामध्ये सुरुवातीला अवघडल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र असे संकुचित मनाने जर वर्कआउट केले तर आपले उद्दिष्टे सफल होणार नाही. यासाठी जीममध्ये जाताना या सहा गोष्टींचा संकोच अजिबात नकोच.
* वजन जास्त असणे
जर आपले वजन इतरांपेक्षा जास्त असेल तर संकोच वाटू देऊ नका. कदाचित त्यांचेही वजन जीम जॉइन करतेवेळी जास्त असेल आणि आता सततच्या व्यायामाने कमी झाले असेल. त्यामुळे जीममधील फीट व सडपातळ लोकांकडे पाहून स्वत:बद्दल लाज वाटून घेण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरीत व्हा व व्यायामाला लागा.
* मशिनबाबतचे ज्ञान
पहिल्यांदाच जीममध्ये जात असाल तर तुम्हाला प्रत्येक मशिनबाबत योग्य ज्ञान करुन घेणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही तज्ञांच्या मदतीशिवाय एखादे मशिन वापरले तर तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते.जीममधील इतर माणसे जलदगतीने सर्व मशिनवर वर्कआऊट करु शकतात कारण त्यांना काही महिन्यांपासून तिथे व्यायाम करण्याचा सराव असतो. तुम्हाला देखील तसे करणे नक्कीच जमेल पण त्यासाठी दोन आठवड्यांपासून तुम्ही ते शिकण्याचा जीममध्ये करीत असलेल्या प्रयत्न सोडून देऊ नका.
* चांगले दिसणे
काही महिला जीममध्ये मेक-अप करुन अथवा थोड्याफार अॅक्सेसरीज घालून जातात. तर काही जणी मेक-अप न करता देखील अतिशय आकर्षक दिसतात. पण यामुळे तुम्ही उदास होण्याची गरज नाही. कारण जसजसा तुम्ही व्यायाम करु लागाल तुमच्या चेहºयावर देखील ग्लो येईल. त्यामुळे फक्त स्वत:च्या वर्कआऊटवर लक्ष द्या.
* कपड्यांची तुलना
जीममध्ये जाण्याचे आपले उद्दिष्ट वेगळे असते. तिथे कोणताही फॅशन परेड नसते, म्हणून ब्रॅन्डेड कपडे घालून तुमचे वजन कमी होणार नाही. जर तुमचे कपडे स्वच्छ व आरामदायक असतील तर तुम्हाला त्याबाबत संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण त्यामुळे इतरांच्या कपड्यांशी आपल्या कपड्यांची तुलना करीत बसण्यापेक्षा तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यामध्ये मोकळेपणाने व आत्मविश्वासाने वावरा.
* इतरांशी बोलणे
जीममधील प्रत्येक व्यक्ती फ्रेन्डली असेल असे नाही. काही लोक चांगल्या स्वभावाचे असतील तर काही लोक शिष्ट स्वभावाचे असू शकतील. कोणी कोणत्याही स्वभावाचे असले तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. जर तिथे तुमच्याशी कोणी नीट बोलत नसेल तर ठिकच आहे. कारण तुम्ही तिथे मैत्री करण्यासाठी नक्कीच जाणार नाही आहात.
* स्टॅमिना कमी वाटणे
तिथल्या इतर लोकांचा स्टॅमिना तुमच्यापेक्षा जास्त असेल तर काहीच हरकत नाही. त्यासाठी स्वत:ला झटपट स्टॅमिना वाढविण्यासाठी पूश करु नका. तुमचा स्टॅमिना हळूहळू व दररोज व्यायाम करुन वाढू लागेल. तुमचे ट्रेनर त्यासाठी तुम्हाला मदत करतील. उगाचच दाखविण्यासाठी तुमचा क्षमता नसताना स्टॅमिना वाढवून दाखवू नका.