Fitness : ​जास्तच सडपातळ आहात का? वापरा हे फुड्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2017 09:10 AM2017-09-08T09:10:18+5:302017-09-08T14:40:18+5:30

जर आपणही आपले वजन वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले असतील तर काही घरगुती उपायांद्वारे आपल्या सडपातळपणाला दूर करु शकता. जाणून घेऊया त्या उपायांबाबत...

Fitness: Is it too slim? Use O Foods! | Fitness : ​जास्तच सडपातळ आहात का? वापरा हे फुड्स!

Fitness : ​जास्तच सडपातळ आहात का? वापरा हे फुड्स!

Next
ेचजण जरा जास्तच सडपातळ असतात. आपणही सेलिब्रिटींसारखे फिट दिसावे, आपली पर्सनॅलिटी चारचौघात उठून दिसावी असे सडपातळ व्यक्तींना नेहमी वाटत असते. बऱ्याचदा यासाठी ते खूप प्रयत्नही करतात, मात्र पदरी निराशाच पडते. जास्त सडपातळपणा आपल्या पर्सनॅलिटीवर विपरित परिणाम करतो. आपले शरीर जास्त लठ्ठही नको आणि जास्त सडपातळही नको. सडपातळपणामुळे कोणताही ड्रेस परिधान केला तर तो चांगला दिसत नाही. बऱ्याचदा याच सडपातळपणामुळे लोकांना लाजिरवाणे व्हावे लागते. जर आपणही आपले वजन वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले असतील अणि फायदा मिळाला नसेल तर काही घरगुती उपायांद्वारे आपल्या सडपातळपणाला दूर करु शकता. जाणून घेऊया त्या उपायांबाबत...
 
* चणादाळ 
दुबळेपणा दूर करण्यासाठी चणादाळ उपयोगात येऊ शकते. यासाठी रोज रात्री ८ ते ९ चमचे चणादाळ पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर सकाळी या दाळमध्ये बेदाणे आणि मिश्री मिक्स करून सेवन करावे.  

* मनुके 
मनुके सेवन केल्याने बरेच आजार दूर होतात, मात्र ७ ते ८ मनुके गरम पाण्याने धुवून रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी हेच पाणी सेवन करा. यानेही दुबळेपणा कमी होऊ शकतो.  

* मध आणि हळद 
एक चमच मधात एक चमच हळद पावडर एकत्र करा. या मिश्रणाचे रोज सेवन करावे. या उपायानेही दुबळेपणा दूर होऊन वजन वेगाने वाढू शकते.   

* केळी  
केळीचे सेवन केल्यानेही बऱ्याच आरोग्याच्या समस्या दूर होतात. शिवाय वजनही वेगाने वाढविता येते. रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन केळीसोबत एक ग्लास दूधाचे सेवन करावे.  

* ड्राय फ्रूट्स 
दुबळेपणा दूर करायचे असल्यास डायटमध्ये ड्राय फू्रट्सचा समावेश असावाच. त्यात बदाम आणि काजू एक ग्लास दुधात मिक्स करुन रात्री झोपण्याअगोदर सेवन करावे.  

* दालचिनी 
एक ग्लास दुधात एक चमच दालचिनी पावडर आणि मध मिक्स करुन सेवन करावे. यानेही वजन वेगाने वाढण्यास मदत होते.      

Web Title: Fitness: Is it too slim? Use O Foods!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.