Fitness Secret : भूमी पेडणेकरने असे केले ३० किलो वजन कमी !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2017 08:33 AM2017-06-20T08:33:01+5:302017-06-20T14:03:01+5:30
जाणून घेऊया भूमीने फिट राहण्यासाठी म्हणजे ३० किलो वजन कमी करण्यासाठी काय उपाय केले ते.
Next
२ १५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी भूमी पेडणेकर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ यावरून चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील तिच्या स्लिम लुकने सर्वांनाच चकित केले आहे.
सेलिब्रिटींचा चित्रपटातील लुक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यासाठी त्यांना कधी वजन वाढवावे लागते तर कधी वजन कमी करावे लागते. भूमीनेही या चित्रपटात स्लिम लुक दिसण्यासाठी सुमारे ३० किलो वजन कमी केले आहे.
भूमीने आपल्या फिटनेसचे सिक्रेट बऱ्याचदा शेअर केले आहे. मात्र यावेळी तिने संपूर्ण डिटेल्स इन्टाग्रामवर शेअर केले आहे. जेणेकरुन तिचे फॉलोव्हर्सदेखील फिट आणि स्टायलिश दिसू शकतील.
जाणून घेऊया भूमीने फिट राहण्यासाठी म्हणजे ३० किलो वजन कमी करण्यासाठी काय उपाय केले ते.
* ब्रेकफास्ट
भूमी सकाळीच ५० मिली अॅलोव्हेरा ज्यूस आणि एक ग्लास डिटॉक्स वाटर घेते. त्यानंतर ती एक तास व्यायाम करते. व्यायाम केल्यानंतर तीन अंड्यांचे आमलेट, दोन मल्टीग्रेन ब्रेड, एक ग्लास स्किम्ड मिल्क, दोन चमच डाळिंबाचे दाणे, पाच सफरचंदाचे स्लाइस आणि पपई एवढे ती ब्रेकफास्टमध्ये सेवन करते. यावरुन कळेलच की, भूमीचा ब्रेकफास्ट खूपच हेवी आणि हेल्दी आहे. काही दिवस मात्र ती हरबरा, उकळलेल्या हिरव्या भाजीपाल्यांसोबत चिकन किंवा फिश घेते.
* दुपारचे जेवण
स्लिम आणि फिट दिसण्यासाठी भूमी दुपारच्या जेवणात इंडियन फुड घेते. त्यात मल्टीग्रेनने बनलेल्या दोन चपाती, गावराणी तूप, हिरव्या भाज्या, एक वाटी दाळ आणि एक ग्लास बटर मिल्क यांचा समावेश असतो. शिवाय ती दिवसात चार-पाच लिटर पाणी पिते.
* संध्याकाळचा नास्ता
संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास भूमी एक प्लेट ऋतूमानानुसार ताजे फळ आणि ग्रीन टी घेते. त्यानंतर ती दोन तास वर्कआउट करते. तिचा सकाळचा वर्कआउट साधारण असतो मात्र संध्याकाळी ती जीममध्ये घाम गाळते. कधीकधी भूमी ग्रीन टी ऐवजी फ्रूट शेकचे सेवन करते.
* रात्रीचे जेवण
भूमी रात्रीचे जेवण ८ ते ९ वाजेदरम्यान करते. सर्वप्रथम ती एक प्लेट ग्रीन सलाद, नट्स घेते. त्यानंतर ती ब्राउन राइससोबत ग्रिल्ड फिश किंवा चिकन घेते.
Also Read : Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !
: Fitness secret of Deepika : दीपिकासारखे सपाट पोट हवे असेल तर जाणून घ्या फिटनेस रहस्य !