​Fitness : 'या' कारणाने शिल्पा शेट्टी अजून आहे फिट !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 06:05 AM2017-08-31T06:05:00+5:302017-08-31T11:35:00+5:30

शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील एक फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज आपण तिच्या फिटनेस रहस्याबाबत जाणून घेऊया.

Fitness: Shilpa Shetty is still fit for this reason! | ​Fitness : 'या' कारणाने शिल्पा शेट्टी अजून आहे फिट !

​Fitness : 'या' कारणाने शिल्पा शेट्टी अजून आहे फिट !

googlenewsNext
लॅमरस जगात अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांना स्वत:ला फिट राहावेच लागते. ज्यांनी स्वत:ला काळानुसार मेंटेन ठेवले नाही, असे बरेचजण या क्षेत्रातून कालबाह्य झाले. यासाठी त्यांना आपल्या अतिशय व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून फिट राहण्यासाठी प्रयत्न करावाच लागतो. एवढेच नव्हे तर अभिनेत्रींना चित्रपटातील भूमिकेप्रमाणे कधीकधी वजन वाढवावे लागते तर कधी वजन कमी करावे लागते आणि हे काम पाहिजे तेवढे सोपे नाही.
यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी होय. शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील एक फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज आपण तिच्या फिटनेस रहस्याबाबत जाणून घेऊया.   
शिल्पा शेट्टी कधीही कोणत्याच आहाराला नकार देत नाही. तिच्या शरीराला दिवसातून दोन हजार कॅलरीजची आवश्यकता असते. त्याप्रमाणे ती कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन जास्त करते. ती जास्त शारीरिक मेहनतीचे काम करीत नाही म्हणून तिला अधिक कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता भासत नाही. 
ती सकाळी नाश्त्यामध्ये एक वाटी दाळ आणि एक कप नॉर्मल चहा घेते. शिवाय आठवड्यातून तीन-चार वेळा वर्कआउट करते. वर्कआउट नंतर प्रोटीन शेक, दोन खजूर, आठ मनुके सेवन करते. तसेच ती रोज मांसाहार सेवन करण्यास प्राधान्य देते.  
शिल्पा दुपारचे जेवन २.३० वाजता करते. त्यात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनलेल्या चपात्यांवर तूप लावून सेवन करते. याशिवाय दुपारच्या जेवनात चिकन आणि दाळ यांचाही समावेश असतो. दुपारनंतर शिल्पा ग्रीन टी घेते आणि दिवसभर कोमट पाण्याचे भरपूर सेवन करते. संध्याकाळी सोया मिल्क घेते आणि रात्री सफरचंद आणि सलाद सेवन करते.   

Also Read : ​​Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !
                    : ​शिल्पा शिकवणार Healthy Recipes!

Web Title: Fitness: Shilpa Shetty is still fit for this reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.