Fitness : काय सेवन करुन एवढे फिट राहतात आपले लाडके स्टार्स, जाणून घ्या संपूर्ण डायट !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 10:04 AM2017-08-10T10:04:07+5:302017-08-10T15:34:07+5:30
चला जाणून घेऊया अक्षय कुमारपासून दीपिका पादुकोणपर्यंत...काय आहे त्यांचे फिटनेस रहस्य.
Next
ब लिवूड स्टार्ससाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल तर ती म्हणजे त्यांचे फिटनेस. यासाठी ते योगा, जिमचा आधार तर घेतातच. सोबतच संतुलित आहाराचा डायट प्लॅनही ते आवर्जून फॉलो करतात. चला जाणून घेऊया अक्षय कुमारपासून दीपिका पादुकोणपर्यंत...काय आहे त्यांचे फिटनेस रहस्य.
* अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या फिटनेस संदर्भात खूपच सतर्क राहतो. सिगारेट, मद्यपान आणि पार्ट्यांपासून दूर राहणारा अक्षय कुमार आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी पाच वाजेपासून करतो. योगा आणि व्यायामाशिवाय अक्षय संतुलित आहारदेखील घेतो.
अक्षय नाश्त्यात पराठ्यांसोबत एक ग्लास दूध घेतो. दुपारच्या जेवणात दाळ, चपाती, भाजी आणि दही घेतो आणि रात्रीच्या जेवणात हिरवा भाजीपाला आणि सूप घेत असतो.
* आलिया भट्ट
बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या याच अंदाजाबरोबर स्लिम बॉडीसाठीदेखील ओळखली जाते. ती आपल्या फिटनेसवर खूपच लक्ष देत आहे. ती आठवड्याचे तीन दिवसच काम करते आणि एक दिवस आराम.
ती नाश्त्यात पोहा किंवा भाज्यांचे सेवन करते. दुपारच्या जेवणाअगोदर ती काही फळांसोबत इडली सांबर खाते. तिच्या दुपारच्या जेवणात साधारण दाळ, चपाती आणि भाजी यांचा समावेश असतो. संध्याकाळी इडली सोबत चहा किंवा कॉफी घेणे पसंत करते. रात्रीच्या जेवणात दाळ किंवा भाजी आणि चिकनसोबत एक चपाती सेवन करते.
* रणवीर सिंह
अभिनेता रणवीर सिंहदेखील फिट असून त्यासाठी तो दिवसातून दोनदा व्यायाम करतो. शिवाय योग्य डायट फॉलो करतो.
सकाळी नाश्त्यात अंड्याचा सफेद बलक, चपाती आणि केळी सेवन करतो. तो प्रोटीनयुक्त भरपूर आहार घेतो, सोबतच नियमितपणे प्रत्येक तीन तासानंतर जेवण करतो. दरम्यान सुकामेवाचेही सेवन करतो. यामुळे त्याच्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळते. दुपारच्या जेवणात मासे व भाजीपाला घेतो आणि रात्री प्रोटीन शेक आणि कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार घेतो.
* प्रियांका चोप्रा
बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी प्रियांकाची ओळख आज हॉट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून निर्माण झाली आहे. प्रियांका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा आणि व्यायामाला महत्त्व तर देतेच पण तिच्या डायटमध्ये हिरव्या भाजीपाला आणि फळांचा आवर्जून समावेश असतो.
ती सकाळी एक ग्लास स्किम्ड दूधासोबत दोन अंडी घेते. दुपारच्या जेवणात दाळ आणि भाजीसोबत दोन चपाती घेते. संध्याकाळी तुर्की सॅँडविच किंवा अंकुरित कडधान्यासोबत कोशिंबिर आणि रात्रीच्या जेवणात फ्र ाय भाज्यांसोबत भाज्यांचा सूप आणि ग्रील्ड चिकन घेते.
* दीपिका पादुकोण
दीपिका आपला फिटनेस टिकविण्यासाठी नियमित व्यायाम करत असते. सोबतच संतुलित डायटदेखील फॉलो करते.
सकाळी नाश्त्यात एक ग्लास दूधसोबत दोन अंडे, दुपारच्या जेवणात ग्रील्ड मासे आणि त्यांच्या सोबत भाजीपाला तसेच जेवणादरम्यान ताजे फळ आणि फळांचा रस सेवन क रते. दीपिका दक्षिण भारतीय असल्याने तेथील खाद्यपदार्थ तिला खूप आवडतात. ती विना बटाट्यांचा डोसा आणि हिरव्या चटणी ऐवजी नारळची चटणी घेणे पसंत करते. तिच्या रात्रीच्या जेवणात भाज्यांसोबत चपाटी आणि कोशिंबिर घेते. ती भाताचे सेवन शक्यतो टाळते.
Also Read : Fitness : 'फिट अॅण्ड फाइन' राहायचे असेल तर हे नक्की वाचा !
: HEALTH : वजन कमी करण्यासाठी हा आहे खास शाकाहारी डायट प्लॅन !