​Fitness : बॉडी बनविण्यासाठी आहारात असावेत ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 09:36 AM2017-07-20T09:36:20+5:302017-07-20T15:06:20+5:30

शाकाहारी लोकांना बॉडी बनवायची असेल तर प्रोटीनचा पुरवठा करणारे हे प्रभावशाली पर्याय सुचवण्यात आले आहेत.

Fitness: There are four vegetarian protein-rich foods! | ​Fitness : बॉडी बनविण्यासाठी आहारात असावेत ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !

​Fitness : बॉडी बनविण्यासाठी आहारात असावेत ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !

googlenewsNext
लिब्रिटींसारखे फिळदार शरीर आपलेही असावे असे प्रत्येकाला वाटते. विशेषत: सेलेब्स असे शरीर बनविण्यासाठी नियमित व्यायाम, योगा तसेच डायटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांना प्राधान्य देतात. जेव्हा प्रोटीनचा विचार येतो तेव्हा मात्र डोळ्यासमोर मांसाहारच दिसतो. मात्र बहुतांश लोक हे शाकाहारी असतात. मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी लोकांसाठी चांगल्या प्रतीचे प्रोटीन मिळण्यासाठी फार पर्याय उपलब्ध नसतात. अशा शाकाहारी लोकांना बॉडी बनवायची असेल तर प्रोटीनचा पुरवठा करणारे हे प्रभावशाली पर्याय सुचवण्यात आले आहेत. 

Image result for dry fruits

* सुकामेवा 
स्रायुंच्या बळकटीसाठी बदाम, काजू, अक्रोड यांचे एकत्रित मिश्रण करून घेतल्यास प्रोटीनचा मुबलक पुरवठा होतो. मात्र हे मिश्रण खारवलेले नसावे. यामध्ये तीळ मिसळून घेतल्यास स्नायूंना बळकटी मिळते.  

Related image

* हिरवा वाटाणा 
वाफवलेले ताजे हिरवे वाटाणे भाजी, पराठा, कटलेट, सूप अशा विविध स्वरूपात आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. हिरव्या वाटाण्यांमध्ये प्रोटीन आणि अमायनो अ‍ॅसिड मुबलक असतात. पण याकरिता ताज्या वाटाण्यांचा आहारात समावेश करा.

Image result for black beans

* ब्लॅक बिन्स
बॉडी बनविणाऱ्याच्या आहारात ब्लॅक बिन्सचा समावेश असावाच. राजमा, छोले याप्रमाणेच ब्लॅक बिन्समध्येही प्रोटीन्स आणि अ‍ॅन्टीआॅक्सिडंट मुबलक असतात. याचा वापर करण्यासाठी स्वच्छ धुतलेले ब्लॅक बिन्स १४-१६ तास भिजत ठेवून त्याला प्रेशर कुकरने वाफवा. सॅन्डव्हिचमध्ये किंवा आमटीमध्ये याचा वापर करा. किंवा इतर भाज्यांसोबतही त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो.

Image result for भोपळ्याच्या बिया

* भोपळ्याच्या बिया 
वर्क आऊट करत असल्यास स्नायूंना बळकटी येण्यासाठी २ टीस्पून भोपळ्यांच्या बीयांची पूड घ्यावी. एक टीस्पून भोपळ्याच्या बीयांची पूड नियमित तुमच्या जवळ असणं फायदेशीर आहे. बिना खारावलेल्या भोपळ्याच्या बीयांमध्ये प्रोटीन मुबलक असते. यामुळे अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रणही ठेवता येते. 

Also Read : ​Health : ​वजन वाढविण्यासाठी ‘या’ हेल्दी पदार्थांचा करा वापर !
                   : ​Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ !


source : thehealthsite.com

Web Title: Fitness: There are four vegetarian protein-rich foods!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.