Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 06:36 AM2017-09-03T06:36:38+5:302017-09-03T12:13:35+5:30

बॉडी बनविण्याचे बरेच गैरसमज आहेत जे तरुण सत्य मानतात. जाणून घेऊया त्या गैरसमजांबद्दल...

Fitness: These are body building's '5' big misconception, everyone sees the truth! | Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !

Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
फिट राहण्यासाठी मुले बॉडी बनवितात आणि यासाठी जिमदेखील जॉइन करतात. विशेषत: तरुणांमध्ये बॉडी बनविण्याची क्रेझ जास्त दिसून येते. बॉडी लवकर बनण्यासाठी काही मुले तर दिवसातून बरेच तास जिममध्ये घालवितात आणि काहीजण तर सप्लीमेंटदेखील घेतात. त्यांचे असे मानने आहे की, असे केल्याने कमी वेळेत चांगली बॉडी बनली जाऊ शकते. याशिवायदेखील बॉडी बनविण्याचे बरेच गैरसमज आहेत जे मुले सत्य मानतात. जाणून घेऊया त्या गैरसमजांबद्दल...
 
* दिवसातून हजार सिट अप्स आवश्यक  
हा देखील गैरसमज आहे. फक्त सिट अप करणे आवश्यक नाही. जर आपण  ऐब्डॉमनल मसल्स बनविण्यासाठी पूर्ण मेहनत करीत आहात तरी देखील रिझल्ट मिळत नसेल तर समस्या फॅट परसेंटेजची आहे. अशावेळी आपल्या डायटवर लक्ष द्यावे.  

* रोजच वेट लिफ्टिंग आवश्यक 
रोजच वेट लिफ्टिंग करणे प्रत्येकाच्या शरीरासाठी चांगले नसते. याने मसल्सवर विपरित परिणाम होऊ  शकतो. आठवड्यातून दोन - तीन दिवसच वेट लिफ्टिंग करावी. याव्यतिरिक्त उर्वरित दिवस एक्झरसाइज आणि योगा करावा.  

* सप्लीमेंट खाणे 
जिममध्ये जाणारे लोक समजतात की, सप्लीमेंट आहाराने बॉडी बनते मात्र हा एक गैरसमज आहे. याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. नेहमी नॅच्युरल प्रोटीन घ्यावे आणि मेहनत करावी. याने बॉडीदेखील बनेल आणि आरोग्यही चांगले राहिल. 

* जड वजनाने मसल्स बनतात 
जिममध्ये तरुणांना ही गोष्ट सांगितली जाते की, जेवढे तुम्ही हेवी वेट लिफ्टिंग करणार, तेवढ्या लवकर मसल्स बनतील मात्र हा गैरसमज आहे. वेट लिफ्टिंग आवश्यक आहे मात्र आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. आपण यासोबत ड्रॉप सेट, हाफ रॅप, स्लो रॅप, सुपर सेट आदींचा वापर करु शकता.   

* जिम ट्रेनरला आहे संपूर्ण नॉलेज 
बरेच तरुण जिम ट्रेनर जसे सांगेल तसेच काम करतात. ते त्याच्या सांगण्यानुसारच डायट सेवन सेवन करतात आणि एक्झरसाइजदेखील करतात मात्र ही गोष्ट आवश्यक नाही की, फिटनेस ट्रेनर शिक्षित असेल. काही लोक अ‍ॅब्स आणि चांगली बॉडी बनवूनदेखील जिम ट्रेनरची नोकरी मिळवतात मात्र डायट आणि बॉडी बिल्डिंगचे पूर्ण ज्ञान प्रत्येकालाच नसते. त्यामुळे आपल्यासाठीचा त्याचा सल्ला कदाचित चुकीचाही असू शकतो.  

Also Read : ​​Fitness : ‘सिक्स पॅक्स’ अ‍ॅब्स बनविण्यासाठी हे आहेत सोपे एक्झरसाइज !
                    
Health : 'या' चुकांमुळे जिममध्ये जाऊनही मिळत नाही परफेक्ट फिगर !

Web Title: Fitness: These are body building's '5' big misconception, everyone sees the truth!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.