भागोsss!'फिटनेस'साठी सुस्साटच धावलं पाहिजे असं नाही; Slow Running करूनही राहाल फिट्ट अँड फाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:40 AM2024-05-15T10:40:02+5:302024-05-15T11:22:59+5:30
Slow Running Benefits : स्लो म्हणजे हळुवार धावल्यानेही तुमच्या फिटनेला खूप फायदा मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्लो धावण्याचे काही खास फायदे सांगणार आहोत.
Slow Running Benefits : जेव्हा विषय फिटनेसचा येतो तेव्हा जास्तीत जास्त लोक वेगाने धावणे किंवा हाय इंटेसिटी वर्कआउट करण्यावर जास्त फर देतात. जिममध्ये जड वर्कआउट करून लोक घाम गाळतात. पण फक्त हाय इंटेसिटी किंवा फास्ट धावणं किंवा चालण्यानेच फायदा मिळतो असं नाही. रिसर्चमधून समोर आलं आहे की, स्लो म्हणजे हळुवार धावल्यानेही तुमच्या फिटनेला खूप फायदा मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्लो धावण्याचे काही खास फायदे सांगणार आहोत.
हळुवार धावण्याचे फायदे
स्लो रनिंग केल्याने पूर्ण शरीर प्रभावित होतं. ज्यामुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांना फायदा मिळतो. स्लो रनिंग केल्याने तुमची शारीरिक काम करण्याची क्षमता वाढते. म्हणजे तुम्ही जर एखादं मेहनतीचं काम करत असाल तर त्यात थकवा कमी येईल. स्लो रनिंगमुळे हाडे मजबूत होतात.
जॉईंट्सला होत नाही इजा
Journal of Orthopaedic & Sports Physical Therapy मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, जास्त वेगाने रनिंग केल्याने आणि हाय इंटेसिटी एक्सरसाइज केल्याने हाडे आणि जॉईंट्सवर दबाव पडतो. तेच स्लो रनिंगमुळे जॉइईंट्स, लिगामेंट इत्यादींवर दबाव कमी पडतो आणि ते लवचिक होतात. याने शरीराची ताकद वाढते आणि स्टॅमिना बूस्ट होतो. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे स्लो रनिंग केल्याने हृदय आणि फुप्फुसांची एक्सरसाइज सोबतच होते. शरीरातील हे दोन्ही महत्वाचे अवयव मजबूत होतात आणि त्यांची क्षमताही वाढते.
वजन होईल कमी
नियमितपणे जर स्लो रनिंग केलं तर दम न लागता आणि जास्त घाम न गाळताही वजन कमी करू शकता. तसेच तुमचं बाहेर आलेलं पोटही याने कमी होईल. पोटावरील चरबी हळूहळू कमी होईल. स्लो रनिंगचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे शारीरिक क्षमताही वाढते.
कशी कराल सुरूवात?
तुम्हाला जर तुमच्या एक्सरसाइज रूटीनमध्ये स्लो रनिंगचा समावेश करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी. तुम्हाला स्लो रनिंगची सुरूवात करायची असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही स्लो रनिंग करू शकता. तसेच याची सुरूवात कमी अंतराने करावी. 20 ते 30 मिनिटे स्लो रनिंग करा. तुमचं फिटनेस जसं चांगलं होईल तशी धावण्याची वेळ वाढवा.
तुम्ही जर स्लो रनिंग नव्यानेच सुरू करत असाल तर सुरूवातील आठवड्यातून 2 ते 3 वेळा रनिंग करा. त्यानंतर तुमचा स्टॅमिना वाढेल किंवा यात तुम्ही सहज व्हाल तेव्हा तुम्ही आठवड्यातून 4 ते 5 वेळा स्लो रनिंग करू शकता. स्लो रनिंग करणं काही हाय इंटेसिटी वर्कआउटसारखं ग्लॅमरस जरी नसलं तर याचे आरोग्याला आणि शरीराला अनेक फायदे मिळतात.