'मिल्क डाएट' च्या माध्यमातून कमी करा चरबी, जाणून घ्या काय आहे मिल्क डाएट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 10:35 AM2018-08-03T10:35:39+5:302018-08-03T10:35:58+5:30
वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय शोधत असता, पण दुधामुळेही तुम्ही वजन कमी करु शकता हे तुम्हाला माहीत आहे का? ऐकायला थोडं वेगळं वाटत असलं तरी मिल्क डाएटच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करु शकता.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय शोधत असता, पण दुधामुळेही तुम्ही वजन कमी करु शकता हे तुम्हाला माहीत आहे का? ऐकायला थोडं वेगळं वाटत असलं तरी मिल्क डाएटच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करु शकता. पण या डाएटसोबतच तुम्हाला तुमच्या मुख्य डाएटवरही लक्ष द्यावं लागेल.
यासोबतच तुम्ही जर मिल्क डाएटसोबत वर्कआउटही करता आणि कमी कॅलरी असलेले पदार्थ खाल तर तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. याने वजन कमी होण्यासोबतच मसल्समध्ये टोन येतो, स्टॅमिना वाढतो आणि तुम्ही फिट राहता. चला जाणून घेऊया कशाप्रकारे मिल्क डाएटमुळे कसं कमी होतं वजन...
मिल्क डाएटने कसं कमी होतं वजन?
हे सर्वांनाच माहीत आहे की, दुधात कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असतं. कॅल्शिअम फॅट्सना वेगाने मेटाबोलाइज्ड करतात ज्याने वजन कमी होतं. नॉक्सविलेतील टेनेसी युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनुसार, जास्त कॅल्शिअम झाल्याने जास्त फॅट बर्न होतात. त्यासोबतच दुधात पेप्टाइड वाय वाय नावाचे भूकेशी लढणारे काही हार्मोन्सही असतात.
मिल्क डाएटसोबत मुख्य डाएटचीही घ्या काळजी
दुधात कॅलरी कमी असतात आणि प्रोटीन जास्त असतात. अभ्यासक म्हणतात की, मिल्क डाएटसोबत भाज्या, फळे, प्रोटीन कार्ब्स आणि हेल्दी फॅटचंही सेवन करावं. या खाद्य पदार्थांमध्ये इतर पोषक तत्वे असतात आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.
कोणतेही साइड इफेक्ट नाहीत
अभ्यासकांनुसार, वजन कमी करण्यासाठी मिल्क डाएट तुमच्या दैनंदिन जीवनात चांगल्या सवयीही आणण्यास मदत करते. या डाएटने तुम्ही तुमच्या शरीरावरी मांस कमी करणार नाहीत. पण तुमचं वजन पुन्हा वाढणार नाही. याने तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.