वजन कमी होईना... वेट लॉस आणि फॅट लॉसमधला फरक माहितीय का?, लोक करतात 'ही' चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 07:03 PM2024-07-23T19:03:53+5:302024-07-23T19:04:17+5:30
काही वेळा चुकीच्या पद्धतीमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं. वेट लॉस आणि फॅट लॉस यातील फरक अनेक लोकांना समजत नाही, ज्यामुळे त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
लठ्ठपणा वाढल्याने अनेक प्रकारचे आजार शरीराला घेरतात. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. ऑफिसमध्ये किंवा घरी तासनतास एकाच जागी बसल्याने शरीरात चरबी जमा होते.
काही वेळा चुकीच्या पद्धतीमुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं. वेट लॉस आणि फॅट लॉस यातील फरक अनेक लोकांना समजत नाही, ज्यामुळे त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत, वेट लॉस आणि फॅट लॉस यात नेमका काय फरक आहे ते जाणून घेऊया…
लठ्ठपणा कमी करण्यासाठी फक्त वेट लॉस करणं योग्य नाही. या प्रक्रियेत शरीराच्या वजनातून मसल्स, पाणी, ग्लायकोजेन आणि चरबी कमी होते. फॅट लॉसमध्ये शरीरात आधीच साठलेली चरबी कमी होते, म्हणून ते अधिक चांगलं मानलं जातं. म्हणूनच फिट राहण्यासाठी वेट लॉस नव्हे तर फॅट लॉसवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
कसं कमी करायचं वजन?
व्यायाम करा
तुम्ही दररोज व्यायाम करा. फॅट लॉस करण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. अनेक रिसर्चमध्ये हे सिद्ध झालं आहे की, लठ्ठ व्यक्तींनी आठवड्यातून तीन वेळा कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग केल्यास त्यांचे मसल्स मेंटेन राहतात आणि एक्सरसाईज न करणाऱ्यांच्या तुलनेत वजन कमी करण्यास मदत होते.
कमी कॅलरीचा आहार
वजन किंवा लठ्ठपणा कमी करण्यासाठी कमी कॅलरी असलेले पदार्थ खावेत. कमी कॅलरीज आणि व्यायाम करून वजन कमी करता येतं. तुम्ही तुमच्या आहारात फळं, भाज्या, धान्य, प्रोटीन यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता. त्याच वेळी, दुग्धजन्य पदार्थ, कमी गोड पदार्थ किंवा ड्रिंक्सचं सेवन करू नका, कारण यातून एक्स्ट्रा कॅलरीज मिळतात.