fitness : विराट कोहलीचे फिटनेस सिक्रेट जाणून व्हाल अवाक !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2017 06:18 AM2017-07-07T06:18:49+5:302017-07-07T11:48:49+5:30
भारतीय क्रिकेट टीममध्ये सर्वांपेक्षा फिट खेळाडू म्हणून त्याची आज ओळख आहे. जाणून घ्या विराटचे फिटनेस सिक्रेट
Next
ख ळाडूंना त्यांचा आहार आणि फिटनेस रुटीनवर खूपच लक्ष ठेवावे लागते. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट कॅप्टन विराट कोहली तर याकडे निश्चितच विशेष लक्ष देतो. भारतीय क्रिकेट टीममध्ये सर्वांपेक्षा फिट खेळाडू म्हणून त्याची आज ओळख आहे. खेळाच्या मैदानावरच नाही तर, विराट स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप कठोर परिश्रम घेताना दिसतो. फिटनेससाठी कसरत करतानाचे व्हिडिओ आपण इन्स्टाग्रामवर पाहू शकता. ज्यात विराट आपणास वेट्सचा अभ्यास आणि जास्तीत जास्त स्क्वॅट्स करताना दिसतो. तो एका सेशनमध्ये कमीत कमी १०० स्क्वॅट्स करतो, हे त्याने स्वत: मान्य केले आहे.
कठोर मेहनत शिवाय, विराट आपला डायट प्लॅनदेखील कटाक्षाने पालन करतो. विराटचे लहानपणीचे कोच, राजकुमार शर्मा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, विराटला लहानपणापासून बटर चिकन, रोल आणि सर्वप्रकारचे फास्ट फूड्स खूपच आवडायचे. मात्र आज त्याच्या डायट प्लॅनमधून वरील पैकी एकही पदार्थ नाही. शिवाय तो डबाबंद ज्यूस कधीही घेत नाही. त्याऐवजी ताज्या फळांचा ज्यूस घेतो. कार्बाेहायड्रेट्स अजिबात घेत नाही.
विराट आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत खूपच सतर्क राहतो. पिण्यासाठी विराट नेहमी बॉटल बंद पाण्याचाच वापर करतो. विशेष म्हणजे एका विशिष्ट ब्रॅँडचेच पाणी पितो, जे फ्रान्समधून इंपोर्ट केले जाते.
विराटसाठी फिटनेस एक ‘पॅशन’ आहे आणि फिटनेससाठी कोणत्याही किमतीत तडजोड करु शकत नाही. खरे म्हणजे विराटने त्याचे ध्येय गाठण्यासाठी खूप काही त्यागदेखील केले आहे.