Fitness : आपणही घटवू शकता ‘या’ सेलिब्रिटींसारखे आपले वजन !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 06:40 AM2017-09-14T06:40:58+5:302017-09-14T12:10:58+5:30
जर आपणही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर या सेलेब्सचा हा फोर्मुला फॉलो करुन आपले वजन कमी करु शकता.
Next
ब लिवूडमध्ये बरेच सेलिब्रिटी अगोदर खूप लठ्ठ होते. विशेष म्हणजे लठ्ठ असूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली, मात्र आता त्यांनी खूप मेहनत करुन फॅट टू फिट अशी ओळख निर्माण केली आहे. यांच्यात प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य, सिंगर अदनान सामी आणि बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा समावेश आहे. त्यांनी हेल्दी डायट आणि कठीण वर्कआउट करुन आपले वजन कमी केले. जर आपणही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर या सेलेब्सचा हा फोर्मुला फॉलो करुन आपले वजन कमी करु शकता.
*अदनान सामी
भारताचे प्रसिद्ध गायक अदनान सामी लठ्ठपणाने खूप त्रस्त होते. त्यांचे वजन २०० किलो होते, ज्या कारणाने त्यांना गुडघ्यांची समस्या निर्माण झाली होती. गुडघ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना तिन महिन्यांपर्यंत बेड रेस्ट सांगितली होती ज्या कारणाने त्यांना अनिद्राची समस्या निर्माण झाली होती आणि वजनदेखील वाढले होते. अशातच डॉक्टरांनी अदनान सामी यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला आाणि त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांचे विशेषज्ञांनी साखर, तांदूळ, बे्रड आणि तेल आदी पदार्थांपासून दूर राहण्याचे सांगितले. त्यानंतर अदनान यांनी सलाद, तंदूरी-मासे, उकडलेली दाळ आणि विना तेलाचे पदार्थ आदींचा डायटमध्ये समावेश केला. याशिवाय अदनान यांनी जिममध्ये जाऊन वर्कआउटदेखील केला ज्याकारणाने वजन कमी होण्यास मदत झाली.
* गणेश आचार्य
फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध कोरियोग्राफर म्हणून गणेश आचार्यची विशेष ओळख आहे. आतापर्यंत गणेशने बऱ्याच दिग्गज बॉलिवूड स्टार्सना डान्स शिकविला आहे. गणेश आचार्यचे वजन सुमारे २०० किलो होते आणि या जड शरीरासोबतच तो डान्सच्या स्टेप्स शिकवत होता मात्र त्याने खूप मेहनत घेऊन आपले वजन ८५ किलो केले. यासाठी गणेशने खूप डान्स केला आणि डायटदेखील दुरुस्त केला. हेल्दी डायट आणि हेवी डान्स मुव्हमेंटद्वारा आज त्याचे शरीर अगदी फिट आहे.
* अनंत अंबानी
भारताचे प्रसिद्ध बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंंबानीचे वजन सुमारे २०८ किलो होते. लठ्ठपणामुळे त्याला डायबिटीज आणि अस्थमासारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. अनंत ने १८ महिन्यात विना शस्त्रक्रिया १०८ किलो वजन कमी केले. यासाठी अनंतने अनहेल्दी खाणे वर्ज्य केले आणि रोज सकाळ-संध्याकाळ पायी फिरत होते. जेव्हा त्याचे वजन थोडे कमी झाले तेव्हा अनंतने दिवसातून ४-५ तास वर्कआउट सुरु केले.