पाच तास झोप हवीच, अन्यथा ओढवतील संकटे! ५० वर्षे व त्यापुढील वयाच्या लोकांना मोठा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 07:14 AM2022-12-17T07:14:35+5:302022-12-17T07:14:51+5:30
ब्रिटनमधील एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात असून त्यावर आधारित एक लेख प्लोस मेडिसिन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
लंडन : ५० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी रोज रात्री ५ तासांपेक्षा कमी झोप घेतली तर त्यांना मधुमेह, विविध प्रकारचे कॅन्सर, हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसांचे विकार, किडनी, यकृताचा आजार, असे गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. ब्रिटनमधील एका संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात असून त्यावर आधारित एक लेख प्लोस मेडिसिन जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.
या संशोधनामध्ये ब्रिटनमधील ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. ते रोज रात्री ५ तासांपेक्षा कमी झोप घेतात व त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम झाले याचे निरीक्षण सुमारे २५ वर्षे करण्यात आले. इतका प्रदीर्घ काळ केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
हे आजार होण्याची शक्यता
रोज रात्री ५ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना मधुमेह, विविध प्रकारचे कॅन्सर, हृदरोग, हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसांचे विकार, किडनी, यकृताचा आजार, नैराश्य, विस्मरण, पार्किन्सन, संधिवात व काही मानसिक विकार यापैकी कोणताही आजार होऊ शकतो.
किती तास झोप आवश्यक?
ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या या संशोधनातील एक शास्त्रज्ञ डॉ. सेव्हरिन सेबिया यांनी सांगितले की, माणसाचे वय वाढते तसतसे त्याच्या झोपेच्या चक्राचे स्वरूप बदलते. जर गंभीर आजार होण्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर रोज रात्री किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपण्याच्या आधी काहीही खाणे टाळावे व मोबाइल फोन, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर राहावे असेही त्यांनी सांगितले.
३०% शक्यता ५० वर्षांपेेक्षा कमी वयाच्या ज्या लोकांनी रोज रात्री ५ तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतली त्यांना गंभीर आजार होण्याची आहे.
nअशीच जीवनशैली असलेल्या ६० वर्षे वयावरील व ७० वर्षे वयाच्या लोकांमध्ये दुर्धर आजार होण्याचा धोका अनुक्रमे ३२ व ४०% आहे. पुरेशी झोप न घेतल्यामुळे रोगग्रस्त होऊन २५% लोक मरण पावतात.