आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं कुणी खाऊ नये अळशीच्या बीया, जाऊ शकते डोळ्यांची दृष्टी...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:27 AM2024-08-29T11:27:11+5:302024-08-29T11:28:45+5:30
Flax Seeds Side Effects: जरी या बियांचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी या बीया घातक ठरू शकतात. जसे या बियांचे फायदे आहेत तसेच काही साइट इफेक्ट्सही आहेत.
Flax Seeds Side Effects: वेगवेगळ्या बियांमध्ये वेगवेगळे पोषक तत्व असतात. याच कारणाने काही बियांचं सेवन करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. यात अळशीच्या बियांचं सेवन करण्याचा सल्लाही अनेकदा दिला जातो. अळशीच्या बियांमध्ये प्रोटीन-कॅल्शिअमसारखे अनेक पोषक तत्व असतात. जरी या बियांचे अनेक फायदे असले तरी काही लोकांसाठी या बीया घातक ठरू शकतात. जसे या बियांचे फायदे आहेत तसेच काही साइट इफेक्ट्सही आहेत. या बियांच्या चुकीच्या वापरामुळे काही लोकांच्या डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.
आयुर्वेद डॉक्टर चैताली राठोड यांनी सांगितलं की, अळशीच्या बीया सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतात. काही स्थितींमध्ये या बियांचं सेवन टाळलं पाहिजे. जर काही स्थितींमध्ये यांचं सेवन केलं तर अनेक गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो. चला जाणून घेऊ या बियांच्या सेवनाने होणारे नुकसान...
अळशीच्या बीया खाण्याचे नुकसान
- अळशीच्या बीया गरम असतात.
- अळशीच्या बियांच्या सेवनाने स्पर्म काऊंट कमी होतो
- डोळ्यांची समस्या असेल तर या बियांचं सेवन करू नये
- अळशीच्या बियांनी पित्त दोष वाढतो
- पाइल्स, मासिक पाळी, नाकातून रक्त येत असेल तर या बीया खाऊ नये.
पित्त वाढतं
अळशीच्या बीया गरम असतात. त्यामुळे पित्त असंतुलित झाल्यावर यांचं सेवन करू नये. आयुर्वेद डॉक्टरांनुसार, या बियांमुळे पित्त वाढतं. तसेच याने कफही वाढतो. कफ आणि पित्त वाढल्याने पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट आणि सीमनची क्वालिटी खराब होऊ शकते.
ब्लीडिंगमध्ये खाऊ नका
कोणत्या प्रकारची ब्लीडिंग होत असेल तर अळशीच्या बियांचं सेवन करू नये. डॉक्टरांनुसार, याने ब्लीडिंग वाढण्याची समस्या होते.
डोळ्यांसाठी घातक
जर तुम्हाला डोळ्यांचा काही आजार किंवा आय डिसऑर्डर असेल तर यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे. या बियांच्या सेवने डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते आणि काही गंभीर केसेसमध्ये दिसणं बंद होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय या बियांचं सेवन करू नये.