अळशी म्हणजे गुणधर्मांचा खजिना; वजन तर कमी होतेच पण त्याहीपेक्षा आहेत मोठे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 02:43 PM2021-06-04T14:43:38+5:302021-06-04T14:44:40+5:30
अळशीचे फायदे मोजावे तितकेच कमी. त्यामुळे अळशी खा आणि तंदरुस्त राहा. जाणून घेऊया अळशी किती फायदेशीर आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी विशेष फायद्याच्या आहेत. त्यांच्यातील गुणात्मक घटकांमुळे आपण त्यांचे सेवन करणे कधीही योग्य आहे. त्यापैकीच एक म्हणजे अळशी. अळशीचे फायदे मोजावे तितकेच कमी. त्यामुळे अळशी खा आणि तंदरुस्त राहा. जाणून घेऊया अळशी किती फायदेशीर आहे.
वजन कमी करणे
अळशीचा वजन कमी करण्यासाठी विशेष फायदा होतो. अळशीत प्रोटीन भरपूर प्रमाणात असते आणि वजन कमी कमी करण्यासाठी प्रोटीनची खुप आवश्यकता असते. अळशीच्या १०० ग्रॅम बीजांमध्ये १८ ग्रॅम प्रोटीन असते. यात म्युसिलेज नावाचे फायबर असते. ज्यामुळे भूक मी लागते. तसेच आपल्याला खाद्यपदार्थांच्या ज्या काही क्रेविंग होतात त्याही कमी होतात. अनेक संशोधनात हे सिद्ध झालेले आहे की अळशीची पावडर खाल्ल्याने मोठ्याप्रमाणात वजन कमी होते.
अळशीच्या सेवनाचे आणखी फायदे
अळशीमध्ये ओमेगा३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य राखण्यासाठी याचा बराच फायदा होतो. अळशीमध्ये बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म असतात. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठीही अळशीचा उपयोग होतो.
अळशीचे योग्य पद्धतीने सेवन
अळशीच्या सेवनाचे फायदे पाहता प्रत्येकाने अळशीचे सेवन केले पाहिजे. मात्र ते योग्यरितीने करणे गरजेचे आहे. कसे ते पहा...
साहित्य-
एक मोठा चमचा अळशीची पावडर
एक ग्लास पाणी
एक चमचा लिंबाचा रस
एक चमचा गुळ
कृती-
अळशीचे सेवन करण्यासाठी प्रथम पाणी उकळून घ्या. त्यात अळशीची पावडर घाला. त्यात लिंबाचा रस आणि गुळ टाका.
अनेक लोकांना माहितही नसेल की अळशी दोन प्रकारची असते एक गडद चॉकलेटी आणि एक पिवळी. दोघांमध्ये सारखेच गुणधर्म असतात. तुम्ही अळशी भाजून घेऊ शकता किंवा त्याची पावडर करू शकता. लक्षात ठेवा ही पावडर हवाबंद डब्यातच ठेवा.