या बियांच्या सेवनाने आरोग्याला होणारे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्, डायबिटीस व हार्ट अटॅकचाही धोका टळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 12:33 PM2022-08-06T12:33:54+5:302022-08-06T12:34:13+5:30

Health Benefits Of Flaxseed: सामान्यपणे अळशीच्या बियांचं पा़वडर तयार केलं जातं आणि मग याचं सेवन केलं जातं. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिली वत्स यांनी सांगितलं की, अळशीच्या बीया खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात.

Flaxseed benefits : High cholesterol, Diabetes, Immunity, cancer, Heart attack strokes | या बियांच्या सेवनाने आरोग्याला होणारे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्, डायबिटीस व हार्ट अटॅकचाही धोका टळेल!

या बियांच्या सेवनाने आरोग्याला होणारे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्, डायबिटीस व हार्ट अटॅकचाही धोका टळेल!

googlenewsNext

Health Benefits Of Flaxseed: आजकाल बरेच लोक आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहतात. यासाठी ते प्रॉपर डाएटसोबतच हेल्दी डाएटचाही आधार घेतात. तुम्ही अशळीच्या बियांबाबत नक्कीच ऐकलं असेल किंवा या बीया खाल्ल्या तरी असतील. यांना सन बीज असंही म्हटलं जातं. यात आढळणारे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. या बीया दिसायला भलेही छोट्या असतील, पण यांचं काम फार मोठ आहे. सामान्यपणे अळशीच्या बियांचं पा़वडर तयार केलं जातं आणि मग याचं सेवन केलं जातं. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिली वत्स यांनी सांगितलं की, अळशीच्या बीया खाल्ल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात.

1) अळशीच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. याने तुम्ही रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करू शकता. सोबतच याने ब्लड शुगर लेव्हलही कमी होते.

2) अलशीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी, मॅग्नेशिअम आणि मॅगनीजसारखे महत्वाचे न्यूट्रिएंट्स आढळतात. जे आपल्या शरीराच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी महत्वाचे असतात.

3) या बियामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन बी सोबतच भरपूर प्रमाणात फायटोकेमिकल्सही आढळतात. ज्यांना फीमेल हार्मोन बॅलन्स करण्यासाठी ओळखलं जातं.

4) जे लोक नियमितपणे अळशीच्या बियांचं सेवन करतात त्यांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्सचा धोका काही प्रमाणात कमी होतो. पण या बीया खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

5) अळशीच्या बियांच्या मदतीने रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं आणि शरीराला आवश्यक गुड कोलेस्ट्रॉल वाढवलं जाऊ शकतं.

6) जे लोक डायबिटीसने पीडित आहेत, त्यांचं ब्लड शुगर लेव्हर कंट्रोल करण्यात अळशीच्या बीया फारच फायदेशीर ठरू शकतात.

7) अळशीच्या बियांमध्ये एक ग्रुप आणि केमिकल्स आढळतात ज्यांना लिंगन्स म्हटलं जात. हे आपल्याला कॅन्सरसारख्या जीवघेण्या आणि गंभीर आजारापासून वाचवतात.

8) कोरोना आपल्यापासून लोक इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी अनेक पदार्थांचं सेवन करतात. अळशीच्या बीया देखील इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Web Title: Flaxseed benefits : High cholesterol, Diabetes, Immunity, cancer, Heart attack strokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.