तुमच्या लघवीतूनही येतो का फेस? या गंभीर आजारांचा आहे हा संकेत...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:07 PM2022-06-13T16:07:03+5:302022-06-13T16:07:28+5:30
Foamy urine causes symptoms : यूरिनचा स्पीड जास्त असल्याने फेस तयार होतो. पण जर लघवीत फेस जास्तच दिसत असेल तर आणि दिवसेंदिवस वाढत असेल तर हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो.
Foamy urine causes symptoms : लघवीचा रंग हलका किंवा गर्द पिवळा होता. असं तुमच्या डाएट किंवा एखाद्या आजारामुळे किंवा काही औषधांच्या सेवनामुळे होऊ शकतं. बऱ्याच लोकांच्या लघवीमध्ये अनेक फेस येतो. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जेव्हा लघवीत फेस दिसतो तेव्हा त्याला क्लाउडी यूरिन असं म्हटलं जातं.
सामान्यपणे लघवीमध्ये फेस येणे ब्लॅडर भरण्याचा संकेत आहे. या स्थितीत यूरिन तुमच्या ब्लॅडरवर हल्ला करते. पण यामागे आणखीही काही कारणे असू शकतात. चला जाणून घेऊ लघवीतून फेस येण्याचं कारण काय आहे.
यूरिनचा स्पीड जास्त असल्याने फेस तयार होतो. पण जर लघवीत फेस जास्तच दिसत असेल तर आणि दिवसेंदिवस वाढत असेल तर हा एखाद्या आजाराचा संकेत असू शकतो. अशात तुमच्या लघवीत फेस दिसत असेल तर याच्या आणखीही काही लक्षणांवर लक्ष देण्याची गरज आहे.
- हात, पाय, चेहरा आणि पोटावर सूज, हे किडनी डॅमेज झाल्याचे संकेत असू शकतात.
- थकवा
- भूक कमी लागणे
- मळमळ
- उलटी
- झोपेची समस्या
- लघवी कमी तयार होणे
- जर तुम्ही पुरूष असाल तर ऑर्गॅज्मवेळी सीमन फार कमी किंवा अजिबातच न येणे
- जर तुम्ही पुरूष असाल तर इंफर्टिलिटीची समस्या होणे
लघवीतून फेस येण्याची कारणं
जेव्हा तुम्ही बराच वेळ लघवी रोखून ठेवता आणि मग अचानक पास करता तेव्हा जास्त स्पीड असल्याने लघवीत फेस तयार होतो. पण हा फेस काही वेळातच क्लीअर होतो. अनेकदा लघवीत फेस तयार होण्याला यूरिनमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असण्याकडे इशारा करतं. यूरिनमधील प्रोटीन हवेच्या संपर्कात आल्यावर फेस तयार होतो.
आणखीही काही कारणं
डिहायड्रेशन - जर कुणाला डिहायड्रेशनची समस्या झाली तर त्यांच्या लघवीचा रंग डार्क दिसतो. असं पाण्याचं सेवन फार कमी प्रमाणात केल्याने होतं. पाण्याचं सेवन कमी केल्याने प्रोटीन यूरिनमध्ये डायल्यूट होत नाही. प्रोटीनमध्ये अनेक अशा प्रॉपर्टीज असतात ज्यांनी यूरिन पास करताना फेस तयार होतो. जर हायड्रेटेड राहिल्यानंतरही एखाद्या व्यक्तीच्या लघवीत फेस येत असेल तर हे किडनी डिजीजचं लक्षण असू शकतं.
किडनी डिजीज - किडनीचं मुख्य काम ब्लडमधील प्रोटीन फिल्टर करणं असतं. प्रोटीन आपल्या शरीरात फ्लूइडला बॅलन्स करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. किडनी डॅमेज झाल्यावर किंवा किडनीसंबंधी काही आजार झाल्यावर हे प्रोटीन किडनीतून लीक होऊन यूरिनमध्ये मिक्स होतं. एल्बुमिन एकप्रकारचं प्रोटीन असतं जे आपल्या रक्तात असतं. जेव्हा तुमची किडनी योग्यप्रकारे काम करते तेव्हा किडनी या प्रोटीनला जास्त प्रमाणात तुमच्या लघवीत जाऊ देत नाही.
डायबिटीस - शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने किडनीत एल्बुमिन हाय लेव्हलमध्ये पास होतं. ज्यामुळे यूरिनमध्ये फेस दिसतो. टाइप 2 डायबिटीसच्या रूग्णांमध्ये खालील लक्षणे दिसतात.
- धुसर दिसणे
- तोंड कोरडं पडणे
- सतत तहान लागणे
- सतत लघवी लागणे
- भूक लागणे
- त्वचेवर खाज येणे