लघवीमध्ये फेस येत असेल तर वेळीच व्हा सावध, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 01:22 PM2023-05-10T13:22:26+5:302023-05-10T13:22:59+5:30

Symptoms of Protein in Urine :सामान्यपणे लघवीसंबंधी समस्यांना यूरिन इन्फेक्शनसोबत जोडलं जातं. पण अनेकदा हा हृदयरोगाचा संकेत असू शकतो. जर तुमच्या लघवीमध्ये फेस तयार होत असेल तर वेळीच सावध व्हायला पाहिजे.

Foamy urine is the symptom of protein in urine problem that can indicate kidney and heart disease | लघवीमध्ये फेस येत असेल तर वेळीच व्हा सावध, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

लघवीमध्ये फेस येत असेल तर वेळीच व्हा सावध, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

googlenewsNext

Symptoms of Protein in Urine : लघवीच्या माध्यमातून नेहमीच आजारांचे संकेत मिळत असतात. जेव्हाही शरीरात काही गडबड होते तेव्हा शरीरातील तत्वांचं संतुलन बिघडतं. रक्तातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त पाणी शरीर लघवीतून बाहेर काढतं

सामान्यपणे लघवीसंबंधी समस्यांना यूरिन इन्फेक्शनसोबत जोडलं जातं. पण अनेकदा हा हृदयरोगाचा संकेत असू शकतो. जर तुमच्या लघवीमध्ये फेस तयार होत असेल तर वेळीच सावध व्हायला पाहिजे. कारण हा प्रोटीनयूरिया (Proteinuria) आजाराचा संकेत असू शकतो. जो किडननी आणि हृदय बंद पाडण्याची खूण असू शकतो.

प्रोटीनयूरिया म्हणजे किडनी डॅमेज

अमेरिकन किडनी फंडनुसार,  जेव्हा किडनी डॅमेज होते आणि योग्यपणे काम करत नाही तेव्हा लघवीमध्ये प्रोटीन (Protein in Urine) येऊ लागतं. ते मॅक्रोन्यूट्रिएंट किडनीच्या कमजोर फिल्टरला चकमा देऊन बाहेर निघतं. याला एल्बुमिनयूरिया असंही म्हटलं जातं.

हार्ट अटॅकचा धोका

लघवीमधून प्रोटीन येण्याला हृदयासंबंधी आजाराशी जोडलं जाऊ लागलं आहे. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की हा संकेत, हार्ट अटॅकचा धोका सांगणारा आहे. हा धोका दिसताच वेळीच काय ते उपाय करायला हवेत.

या लक्षणांवर ठेवा लक्ष

लघवीमध्ये फेस तयार होणं

हात, पाय, पोट आणि चेहऱ्यावर सूज

पुन्हा पुन्हा लघवी लागणे

पोट खराब किंवा उलटी येणे

रात्री मांसपेशींमध्ये वेदना होणे

- कोणत्या कारणाने लघवीमध्ये येतं प्रोटीन

डिहायड्रेशन

हाय स्ट्रेस

फार जास्त थंड तापमानात राहणं

सतत ताप येणं

हाय इंटेंसिटीची फिजिकल अॅक्टिविटी करणं

- प्रोटीनयूरियावर उपचार कसे करावे?

किडनीचा आजार, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर इत्यादी कारणामुळे होणाऱ्या आजारात डाएटसाठी डॉक्टरांशी संपर्क करा.

किडनी हेल्दी ठेवण्यासाठी वजन कमी करा.

ब्लड प्रेशर आणि डायबिटीसची औषधे घ्या.

जर किडनीचे फिल्टर खराब होत असतील तर डायलिसिसची गरज पडू शकते.

Web Title: Foamy urine is the symptom of protein in urine problem that can indicate kidney and heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.