हृदय निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी करा हे 5 खास उपाय, Heart Attack पासून होईल बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 10:13 AM2023-11-13T10:13:21+5:302023-11-13T10:13:49+5:30

Heart Health : कमी वयातही लोकांना हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. अशात तुम्ही तुमच्या हृदयाची खास काळजी घेणं महत्वाचं आहे.

Follow these 5 healthy habits to make your heart healthy and strong | हृदय निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी करा हे 5 खास उपाय, Heart Attack पासून होईल बचाव

हृदय निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी करा हे 5 खास उपाय, Heart Attack पासून होईल बचाव

Heart Health : हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतं. हृदय बंद पडलं तर जीव जातो. आजकाल हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या केसेसे खूप वाढल्या आहेत. इतकंच नाही तर कमी वयातही लोकांना हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. अशात तुम्ही तुमच्या हृदयाची खास काळजी घेणं महत्वाचं आहे.

वजन कमी करा

लठ्ठपणा हृदयासाठी फार नुकसानकारक ठरू शकतो. जेव्हा शरीराच्या मध्य भागाच्या आजूबाजूला जास्त फॅट जमा होऊ लागतं तेव्हा हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जास्त वजन असलेल्यांची फिजिकल अॅक्टिविटीही कमी होते, हेही हृदयासाठी चांगलं नाही.

ब्लड प्रेशरची नियमित टेस्ट करा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहणंही महत्वाचं आहे. यासाठी तुम्ही नियमितपणे ब्लड प्रेशर चेक केलं पाहिजे. हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयरोगांचा धोका आणखी वाढतो. 

ब्लड शुगर नियमित चेक करा

शुगर लेव्हल कमी-जास्त होणंही हृदयासाठी चांगलं नाही. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवणं शरीराच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. हाय ब्लड शुगर लेव्हलला डायबिटीसचं रूप मानलं जातं. जे हृदयासाठी घातक ठरतं. त्यामुळे गरजेचं आहे की, डाएट आणि एक्सरसाइजने डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवाल.

हेल्दी लाइफस्टाईल

हेल्दी हार्टसाठी हेल्दी लाइफस्टाईलही महत्वाचं असते. यासाठी तुम्ही शारीरिक रूपाने अॅक्टिव रहा, हेल्दी डाएट आणि चांगली झोप घ्यावी. या तिन्ही गोष्टी हेल्थसाठी फार महत्वाच्या आहेत. तुम्ही नियमित व्यायाम करावा. हेल्दी हार्टसाठी दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे एक्सरसाइज करावी. हेल्दी डाएटसाठी आहारात भाज्या, फळं, कडधान्य, पौष्टिक खाद्य पदार्थ आणि प्रोटीनचा समावेश करा.

तेलकट कमी खा

हृदय निरोगी ठेवण्यासाठी तेलकट पदार्थ आणि मसालेदार पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. हे तुमच्या हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकतं. फ्राइड फूड्समध्ये जास्त सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट असतं. जे तुमच्या हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
 

Web Title: Follow these 5 healthy habits to make your heart healthy and strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.