'ही' पथ्ये पाळा आणि 'ऑक्टोबर हिट'चा त्रास टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 01:27 PM2018-10-01T13:27:28+5:302018-10-01T13:35:19+5:30

दिवसभर कडक ऊन आणि पहाटे थंडी अशी मिश्र वातावरणामुळे अनेक जण आजारी पडताना दिसत आहेत.

Follow these ' health rules' and avoid 'October hit' problem | 'ही' पथ्ये पाळा आणि 'ऑक्टोबर हिट'चा त्रास टाळा

'ही' पथ्ये पाळा आणि 'ऑक्टोबर हिट'चा त्रास टाळा

Next

पावसाळा  संपून अवधी उलटण्याची आताच 'ऑक्टोबर हिट'ने वातावरणाचा ताबा घेतला आहे. दिवसभर कडक ऊन आणि पहाटे थंडी अशी मिश्र वातावरणामुळे अनेक जण आजारी पडताना दिसत आहेत. ऑक्टोबर नंतर लगेचच नवरात्री  आणि दिवाळी येणार असल्यामुळे तब्येत राखणे गरजेचे आहे. त्यामुळे वातावरणाच्या बदलाशी सामना करण्यासाठी या काही खास टिप्स. 

 

  • अचानक वाढलेल्या तापमानामुळे आईस्क्रीम, बर्फाचा गोळा खाण्याची इच्छा होते. मात्र त्याचे उलट परिणाम होऊन सर्दी होऊ शकते. शिवाय उष्ण वातावरणात जीवाणू अधिक जोमदार काम करतात. त्यामुळे संसर्गजन्य रोग झपाटय़ाने पसरतात. अतिथंड पेयामुळे जीवाणूंसाठी पोषक परिस्थिती निर्माण होते.

 

  • या काळात शरीर तापमान राखण्यासाठी घामावाटे उत्सर्जन करत असते. त्यामुळे भरपूर पाणी, नारळपाणी, कोकम सरबत पिणे योग्य ठरेल. जेवणात ताजे, घरगुती ताक पिणेही श्रेयस्कर ठरेल. 

 

  • श्रावण संपल्यामुळे बाहेर चमचमीत आणि तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. पण त्यालाही आवर घाला.कारण  बदलत्या हवामानात शरीर अशा गोष्टी सहजपणे पचवू शकेलच असे नाही. 

 

  • या हवेमुळे अनेकदा पित्ताचे प्रमाणही वाढू शकते. त्यामुळे वारंवार चहा, कॉफीचे सेवन करणे टाळावे. उडीद आणि हरभरा डाळीपेक्षा मुगाच्या डाळीचे पदार्थ आहारात ठेवावेत. 

 

  • याशिवाय पालक, टोमॅटो किंवा मिक्स भाज्यांच्या सूप'चा समावेश जेवणात करा. 

 

  • जेवणाच्या आणि  झोपण्याच्या वेळा आवर्जून पाळा. आणि सर्वात महत्वाचे झेपेल एवढा व्यायाम नक्की करा.यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

Web Title: Follow these ' health rules' and avoid 'October hit' problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.